Wednesday 28 February 2018


स्त्री आणि पर्स
हा लेख
महिलावर्गासाठी खास
स्त्री च्या आयुष्यात "पर्स" म्हणजे
एक अविभाज्य घटक आहे!
कुठेही जायचे तर "पर्स" हवीच!!
.
.
काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच!!
.
.
ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात ----
.
# सखी
.
.
स्त्रीची एक जिवाभावाची सखीे...
.
तिच्या शिवाय ती अजिबात राहू शकत नाही,
जिथे ती तिथे पर्स आणि
ही सखी म्हणजे तिची पर्स
.
इतर सगळ्या बायकांच्या सारखं
तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे....
नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि
हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .
.
मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर ,
मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार
.
गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार*
.
.
*अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा
तर कंगवा न चुकता हातात येणार.....
.
सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार....
.
.
या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते
आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते
.
पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही....
आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच......
.
.
त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,
सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..
पर्स मधे ठेवलेल्या वस्तू 'तुझ्या गळा,माझ्या गळा" गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात*
आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना
स्त्रीचा जीव निघतो.
.
.
महत्वाच्या वस्तू,कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते,पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही,ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात,आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.
.
.
*एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री,पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच,म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते,नेमकं कुठं तरी वाट बघत बसायची वेळ येते.*
.
.
नेहमी लागणारी औषध,वेलदोडा,चणेफुटाणे,चॉकलेट्स,पेन्सिल,
लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,
लिपस्टिक,पावडर कॉम्पेक्त,घरच्या किल्या,
अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्स मध्ये ..
.
.
त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही(जिच्यात मी नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो),
.
.
अनेक लोकांची कार्डस(जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.
.
.
तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र
फार गॅरेंटी नसते.
.
.
पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक
अविभाज्य भाग आहे हे नक्की...
तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही,
कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.
.
.
*जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्या साठी एक दिव्य असते,"जा मुली जा"अशी भावूक अवस्था असते तिची..*
.
.
नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्स ला नाव ठेवता ठेवता तिच्या वर अवलंबून राहायला सुरु होणे
*या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते*
.
.
अशीच स्त्रीची व पर्स यांची जोडगोळी भटकत राहते, मजा करत, मजा लुटत.

Tuesday 27 February 2018


✍💐✍
*लुगड्याची गोष्ट .*
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बरं बोलली?..........तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते,त्यांची भेट घेतली.आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या... कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!*
♥♥♥♥♥♥♥♥हृदयस्पर्शी वाचणिय अर्थपुर्ण पोस्ट 🙏​

Monday 26 February 2018

💐✍💐
*एक प्रयोग*
रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत....
याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.
काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.
    *तुम्ही पण हा प्रयोग करून बघाच्. जसं आपण कधी बंद असलेल्या मंदिरा समोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो.. मग तसंच् या प्रयोगावर पण विश्वास करून बघा नं.. अट फक्त एकच् आहे बरका.. की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे.. मग कराल नं आज असं..!!*

Sunday 25 February 2018

सुंदर बोधकथा आहे,
 आवडल्यास
इतरांनाही सांगावी अशी .....
एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन
पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"
वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू
लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.
वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.
त्यानंतर वडील कावळ्याने
मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात
घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."
वडील कावळा म्हणाला, "थांब,
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."
मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने
तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.
मग तो झाडावर येवून बसला.
वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"
थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.
फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.
आमच्या धर्माचा अपमान
झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात
होते.
खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे
होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..
गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.
आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.
कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."
इतके बोलून दोघे बाप-लेक कावळे मांस खाण्यासाठी उडून गेले.

Saturday 24 February 2018

काही हरवलेले नंबर्स
********************
होतं असंही कधी कधी
असतात अशा व्यक्ती काही
ज्या आता फक्त
फोनवरच उरलेल्या असतात
सगळ्या नंबर्सच्या लिस्टमध्ये
आपला रकाना पकडून बसतात.
कधीतरी मेसेज केला जाईल
 ह्या प्रतीक्षेत...
पण खूपदा कसलीच हालचाल नसते
कित्येक दिवसात विचारपूस नसते
बोलणं होत महाग.. आणि
मेसेजशीही कट्टी असते
कधीतरी डीपी बघितला जातो
कधी स्टेटस वाचलं जातं
काही क्षणांसाठी मग
मनातल कवाड उघडलं जातं
घडत तसं काहीच नाही ते...
मिटलही जातं .. पुढच्याच क्षणात
कितीतरी खिडक्या
उघडलेल्या असतात ...ह्या
चॅट नामक  ... गदारोळात
 मग होतात काही स्थित्यंतरं
वाढत जातात अंतरं
न पडलेल्या प्रश्नांना
आपसूक मिळणारी उत्तरं
 फोनच्या लिस्टमधून गायब होतात
नांबर्सची उरली सुरली लक्तरं
आणि तरीही थांग न लागावा
 इतकी अदृश्य अंतरं....
कधीतरी मात्र सूर लागतो
जुना राग आळवावा वाटतो
संवादाचा मिटला पंखा अलवारसा
उलगडावा वाटतो
बोटांनी चाळा करूनही
तो नंबर ...दिसत नसतो
व्यक्ती मनात स्पष्ट तरी
नंबर  बाकी ....रकान्यात नसतो...
हातात थिजून राहिलेला फोन
दमलेली बोटं अन उद्विग्न मन
माणसांना जोडणारा...
दूर करू शकणारा...
माणसाहुनही...
ताकदवान ....फोन
दोष तसा फोनचा नाही,
 अन दोष अंतराचा नाही
दृश्य संबंध जोडू पाहणाऱ्या
अदृश्य अशा तारांचा नाही
काही  जागा...रिकाम्या...
रिकाम्याच राहणार असतात
काही फोननंबर्स...
फक्त ..हरवण्यासाठीच असतात
फक्त ..हरवण्यासाठी !!...
...............
....

Friday 23 February 2018


जायचं का परत खेड्याकडे?

दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.
           पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही विशेष नव्हतंच. आणि तरीही फी मात्र डोळे पांढरे करणारी. यात्रेला, लग्नाला, सणाला गावाला येणं जवळपास बंदच झालं होतं. कारण?? एक असेल तर सांगावं.
           दुसरीला नाईलाजास्तव शेतकऱ्याला दिलेली. जेमतेम 3 एकर जमीन. पण मागच्याच महिन्यात पोरानं विक्रमी उत्पादनासाठी कृषी पुरस्कार पटकावला. रोज ची 4 माणसं हाताखाली असतात. शेजाऱ्याची 3 एकर जमीन करायला घेतलेली. काम पडतं थोडाफार पण झोप लागते शांत. पोरं तालुक्याच्या चांगल्या शाळेत जातात. शेत चांगलं पिकतं तरी खूप जास्त पैसे मिळतात असं काही नसलं तरी खर्च भागून उरतातच. भविष्याची पुंजी. कष्ट आहेत पण दगदग नाही. ज्या पोटासाठी मरमर करायची त्यात वेळच्या वेळी तुकडा जातो हे महत्वाचं. सगळे सण, सगळे कार्यक्रम अगदी भपकेबाज नाही पण नटून मिरवते ती पण. कसं जगल्यासारखं वाटतं.
          कशासाठी होता शहराचा अट्टाहास? जास्त पैसे, सुख, शांती, समाधान, काम नको जास्त, मुलांचं शिक्षण, पुढच्या पिढ्यांचं कल्याण. जास्त पैसे मिळतात पण मग उरतात किती? सुख-शांती-समाधान म्हणजे काय हे कळण्याइतका तरी असतो का वेळ? 4 तास रेल्वे मध्ये लोंबकळत थांबणं तेही ज्यात श्वास घेऊन घाम यावा इतक्या गर्दीत. असा कितीसा फरक पडतो आजकाल गावच्या आणि शहरातल्या शिक्षणात. पिढी घडतेय तिथे कि बिघडतेय हा मुद्दा उरतोच.
          थांबा थांबा. याचा अर्थ शहरात जायलाच नको गावातच बरंय. शहरातच प्रॉब्लेम आहेत गावात नाहीत असं नव्हे. म्हणायचं इतकंच आहे की तुच्छतेने बघावं इतकं वाईट आहे का गावात राहणं? गावी राहणं म्हणजे काय मागासलेपण आहे का? सुख समाधान नाहीच का तिथे? शहरात 10बाय 10 च्या खोलीत राहणारांनी गावाला आल्यावर गावाकडचे येडे आणि आपणच शहाणे असा समज का करून घ्यावा? जेमतेम 10 वि झालेल्या मुलीच्या बापानेपण नाक मुरडावे एवढ वाईट काय आहे शेतकऱ्यांत? "जय जवान जय किसान" चा "नको जवान नको किसान" का झाला?
            जास्त अपेक्षा, मोठी स्वप्न असण्यात गैर काहीच नाही. पण कधीकधी आपल्याला नक्की काय हवय आणि नक्की आपण कशाच्या मागे पळतोय याची सांगडंच बसत नाही. उदाहरणार्थ, हवं असतं आयुष्यात स्थैर्य आणि समज असा की जास्त पैसे असलं की ते येतं. आणि मारतो उड्या बिचारा या कंपनीतून त्या कंपनीत. मुलांना "चांगलं" शिक्षण हवं असतं म्हणून मग इंग्लिश माध्यम, वरून सकाळ संध्याकाळ क्लास.... ते बिचारं पोर विचार करायचं, स्वतः शिकायचं विसरूनच जातं आणि मग पुढे 12 वी ला 85% घेणारा पदवीला 40 वर येतो. मुलीला त्रास होईल म्हणून मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब नको असतं. पण मग कितीही आजारी पडलं तरी पाणी देणारं पण कोणी घरात नसतं. सगळी कामे एकटीलाच पहावी लागतात. आणि यात जास्त त्रास होतो पण हा त्रास बोलताही येत नाही कारण स्वतःच्या हाताने तो ओढवून घेतलेला असतो.
          याचबरोबर शहरात स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य आणि हक्क आहेत असा एक समज जनमानसात प्रचलित आहे. परंतु work force participation हे ग्रामीण भागात जास्त आहे असेच आकडेवारी दाखवते. स्त्रियांचे Political participation देखील ग्रामीण भागातच जास्त दिसते. ग्रामीण स्त्रिया स्वतः प्रत्यक्ष काम करून आर्थिक हातभार लावत असल्याने आर्थिक स्वायत्तता देखील त्यांना जास्त आहे. काही प्रमाणात या गोष्टी qualitatively शहरी भागात जास्त असतील पण quantitatively ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक resourcefulness जास्त आहे हे मान्य करावे लागेल. रायगड जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सरपंच महिलेने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत जमीन अधिग्रहनाबाबत केलेली bargaining पाहिली आणि ग्रामीण भागात भरीव महिला सबलीकरण होतंय यावरचा विश्वास आणखी दृढ झाला.
          वरील उदाहरणावरून दिसून येतंय की मृगजळाला भुलून लोकं शहराकडे पळतायत आणि मग झालेला अपेक्षाभंग दाखवता देखील येत नाही. आणि खरं तर थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर ते सगळं गावात देखील कमीजास्त प्रमाणात साध्य होऊ शकतं. त्यासाठी नक्की काय हवंय आणि जे करतोय त्यातून नक्की तेच मिळतंय का हे पहावं लागणार आहे.
          शहरात झगमगाट आहे आणि प्रदूषण पण.  शहरात सुविधा आणि तणाव पण. शहरात पैसे जास्त मिळतात आणि तितकेच खर्च पण होतात. शहरात वस्तू हव्या त्या मिळतात पण माणसं तूटतात.
           शहरांना पर्याय नाही हेही मान्य पण याचा अर्थ गावात राम नाही असा होत नाही. जे गावात मिळत नाही त्यासाठी नक्की शहराकडे वळा पण जे फक्त मिळतंय असं वाटतं पण प्रत्यक्ष मिळत नाही त्यासाठी मात्र अट्टाहास नको. सगळ्यांना शहरात जाणं शक्य नाही. आणि हळू हळू सगळ्या सुविधा गावापर्यंत पोचल्या आहेत. आता गरज आहे ती ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. शेतीला जोडधंद्यांची जोड, अन्नप्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागात विस्तार, MIDC, आधुनिक शेती यामध्ये रोजगारास बराच वाव निर्माण होऊ शकतो.
          शहरातील STANDARD OF LIVING च्या जवळपास 70% ग्रामीण STANDARD OF LIVING पण झाले आहे. आता गरज आहे ती या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची. यात मुलींचा आणि त्यांच्या आई वडिलांचा रोल महत्वाचा आहे. शहरातला नवरा असावा अशी अपेक्षा असावी, अट्टाहास नको. PEAK HOURS ला रेल्वे मध्ये लोम्बकळणाऱ्या आणि ट्राफिक मध्ये 2-2 तास गाडी कमी चालवणाऱ्या व ब्रेक जास्त मारणाऱ्यांपेक्षा ठिबक करून शेत पिकावणारा जास्त QUALITY LIFE जगतो हे कुठेतरी मान्य करावं लागेल.
          यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना त्यांचा जुना social status मिळवून दिला पाहिजे. "शेती उत्तम" हे जुन्या काळात का प्रचलित झाले याकडेही थोडे लक्ष वेधावे लागेल. सुख, समाधान, यश या गोष्टींचे नव्याने अर्थ लावावे लागतील. जगण्याकडे आणि एकूणच सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. Materialism(भौतिकवाद) आणि spiritualism(अध्यात्मवाद) यांचा मेळ घालता आला पाहिजे.
       त्याचबरोबर गावांना शहाराप्रमाणे लोकांना स्वप्न दाखवता आलं पाहिजे. ग्रामीण भागात आज काही प्रमाणात स्वप्नांचे पंख छाटायचं काम होतं त्यात बदल झाला पाहिजे. ग्रामीण भागाने स्वतःची अशी एक "चांगल्या जीवनाची" व्याख्या करायला हवी. आणि मग थोडंस नवीन पद्धतीने तिचं marketing करायला हवं. तरच ग्रामीण जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी आकर्षक ठरेल.
        एवढं केलं तरी आपल्या, भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
        सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं मुळीच नाही. पण काही गोष्टींवर विचार करायची वेळ आलीय हे नक्की.

Thursday 22 February 2018


आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी शंभरची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली‍,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....  gm

Wednesday 21 February 2018


*गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,*
*माणसं तडतड करत आहेत.*
*काय झालंय कळत नाही,*
*फारच चीडचीड करत आहेत.*
*नातेवाईक असो, मित्र असो,*
*भयंकर स्पर्धा वाढलीय.*
*तेंव्हापासूनच माणसाची,*
*मानसिक अवस्था बिघडलीय.*
*कुणी कुणाला काहीच विचारीना,*
*मनानचं कसंही वागायलेत.*
*आजूबाजूच्या लोकांकडून,*
*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*
*कमाई किती, खर्च किती,*
*काहीच कुठे मेळ नाही.*
*भेटायला जाणं, गप्पा मारणं,*
*आता कुणालाच वेळ नाही.*
*कॅपॅसिटी नसतांनाही,*
*खरेदी उगीच करायलेत.*
*Salary व्हायलीय कमी,*
*अन हप्तेच जास्त भरायलेत.*
*शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,*
*की हा घेतो फोर व्हीलर.*
*दूध बॅग आणायला सांगितली की,*
*मोजीत बसतो चिल्लर.*
*अरे, अंगापेक्षा बोंगा,*
*कशाला वाढवून बसतो.*
*पगार जरी झाली तरी,*
*उदास भकास दिसतो.*
*पर्सनल लोन, Gold लोन,*
*जे भेटेल, ते घ्यायलेत,*
*दिलेले पैसे मागितले तरी,*
*गचांडीलाच धरायलेत.*
*सहनशीलता आणि संयम,*
*कुठे चाललाय कळत नाही,*
*पॅकेज भरपूर मिळायलंय,*
*पण, समाधान काही मिळत नाही.*
*घरी काय दारी काय,*
*नुसत्या किरकीरी वाढल्यात.*
*नवऱ्याला न सांगताच,*
*बायकांनी भिश्या काढल्यात.*
*कितीही साड्या, कितीही पर्स,*
*शर्ट, पँटीला गणतीच नाही.*
*तरीही कुरकुर चालूच असती,*
*धड साडी तर कोणतीच नाही.*
*मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,*
*तुला अक्कल नाही.*
*बायकोनं म्हणावं,*
*तुम्हालाच काही कळत नाही.*
*दोनदोन दिवस अबोला,*
*कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.*
*लग्न झालं की पोरं पोरी,*
*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*
*पत्नी पीडित नवऱ्याच्याही,*
*संघटना निघत आहेत.*
*डोळे मोठे करून पोट्टे,*
*बापाकडेच बघत आहेत.*
*दिवेलागण, शुंभकरोती,*
*'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,*
*शक्य असेल याच्यामुळेच,*
*माणसां माणसात वितुष्ट आलं.*
*चित्त थोडं शांत ठेऊन,*
*जुनी पाने चाळावी लागतील.*
*यदाकदाचित पुन्हा माणसं,*
*एकमेकाशी प्रेमाने वागतील.*

Tuesday 20 February 2018


खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोण लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
*सारी असतात आपलीच माणसं !*

Monday 19 February 2018

रावण बनना भी कहां आसान...
रावण में अहंकार था, तो पश्चाताप भी था
रावण में वासना थी, तो संयम भी था
रावण में सीता के अपहरण की ताकत थी,
तो बिना सहमति पराए स्त्री को स्पर्श न करने का संकल्प भी था
सीता जीवित मिली ये राम की ताकत थी,
पर पवित्र मिली ये रावण की मर्यादा थी
राम,
तुम्हारे युग का रावण अच्छा था..
दस के दस चेहरे, सब "बाहर" रखता था..
महसूस किया है कभी उस जलते हुए रावण का दुःख
जो सामने खड़ी भीड़ से बार बार पूछ रहा था.....
"तुम में से कोई राम है क्या?"😊

Sunday 18 February 2018

👉हिंदी फ़िल्मी गीत जे आजारांचे वर्णन करतात
👈
😇😇😇😇😇😇😇😇😇
गीत - 💥जिया जले, जान जले, रात भर धुआं चले
💥
*आजार - 👉ताप*
➖➖➖➖➖➖➖➖➖
गीत - 💥तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही
💥
*आजार- 👉हार्ट अटैक*
💔💔💔💔💔💔💔💔💔
गीत - 💥बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर म बड़ी आग है
💥
*आजार - 👉एसिडिटी*
😶😶😶😶😶😶😶😶😶
गीत -💥 तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ
💥

*आजार-👉 मोतिबिंदु*
👀👀👀👀👀👀👀👀👀
गीत - 💥तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना
💥

*आजार-👉 स्मृतिभ्रंश*
💥💥💥💥💥💥💥💥💥
गीत - 💥मन डोले मेरा तन डोले
💥
*आजार- 👉चक्कर येणे*
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
गीत -💥 टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
💥
*आजार -  मुतखडा
🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕
गीत - 💥जिया धड़क-धड़क जाये
💥
*आजार - 👉उच्च रक्तदाब*
😴😴😴😴😴😴😴😴😴
गीत -💥 हाय रे हाय नींद नहीं आये
💥
*आजार -👉 निद्रानाश*
💂💂💂💂💂💂💂💂💂
गीत -💥 बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता
💥
*आजार-👉 मुळव्याध*
😁😁😁😁😁😁😁😁😁
गीत - 💥लगी आज सावन की फिर वो झड़ी है
💥
*आजार -👉 जुलाब*
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
लय 💃 भारी  💃
       🙏👌☝☝☝☝👌🙏

Saturday 17 February 2018

💕जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी  तुम्हाला माहीत आहे का.....?
😥अश्रु आणि
😊 हास्य....
कारण हे तुम्हाला फारसे
एकत्र दिसत नाहीत....
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो.
🌹🌹 🌹🌹
💞💞 💞💞

Thursday 15 February 2018

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!
-
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आपल्यामुळे मिळणारं सुख मोठं का खर्चल्यामुळे मिळणारं हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युरल, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही!! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही.
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो.
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो!!
पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

Wednesday 14 February 2018

Nice Thought

💐💐👌​नारळाचे *मजबूत कवच     फोडल्याशिवाय* आतमधील
अमृताचा *आस्वाद* घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे *प्रगतीच्या* वाटेत येणारी *संकटावर* मात केल्याशिवाय *यशस्वीतेचा* आस्वाद घेणे शक्य नाही.
    *संकट* म्हणजे *अपयश*
        नव्हे तो *यशाचाच*
         एक भाग आहे..👌​
     💐💐 🌺 *शुभ सकाळ* 🌺💐💐

Tuesday 13 February 2018

Ekdam sundar kavita

*पु ल देशपांडे यांची सुंदर कल्पना !!*
----------------------------------------------------------
*एकदा "मीपणा" विकून पहा.....*
*जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट*
*आपण इतके दिवस* *बाळगत होतो...???*
*बोलावे तर विचार करुन....*
*नाहीतर बडबड सगळेच करतात....*
*ऐकावे तर अंतःकरणातून.....*
*आरोळी तर सारेच देतात....!*
*टिपावं तर अचूक टिपावं....*
*नेम तर सारेच धरतात....*
*शिकावं तर माफ करायला....*
*राग तर सगळेच करतात....!*
*खळगी भरावी तर उपाशी पोटाची....*
*पोट भरुन तर सारेच जेवतात....*
*प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष...*
*सुखाचे घोट तर सारेच घेतात...!*
*जगावं तर इतरांसाठी....*
*स्वतःसाठी तर सगळेच जगतात....*
*ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...*
*घात तर सारेच करतात...!*
*दुःखामधे सुद्धा रहावं हसत*
*वेळ तर सर्वाँचीच येते....*
*झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं*
*राख तर सर्वाँचीच होते....*
💐💐💐💐💐

Monday 12 February 2018

*दो घडी वो जो पास आ  बैठे...*
 "चार दिवस आधी राहायला येशील ना ग?"
माझ्या जवळ  जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला  "होय" असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर  मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव  पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. ..
असो ...एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात  पडला.
 दोघी आल्या आणि घराचे लग्न घर झाले.खरंतर contract system मधे करायला काही नव्हते पण मुंजीचे भिक्षावळीचे लाडू बहिणीने हाताने रेखले.सासूबाईंची शाबासकी मिळवली.(हे दुसरे अशक्य काम चोख पूर्ण )
धाकटी बाहेरच्या कामात expert.तिने तट शेवटच्या दिवसापर्यन्त लढवला.किरकोळ खरेदी,शिंपी ,बांगड्या सगळं आटपलं.
     मग मांडवात नेण्याचे आहेर ,बॅगा भरता भरता तिघींच्या गप्पांच्या मैफिली झाल्या..फार रेंगाळले कि मग कुणीतरी  भानावर येऊन "चला चला ,उठा...ताट घ्या...भूक लागलीय म्हणून जागे करु लागले"
दोन दिवस आधी बाकीच्या भावंडानी हजेरी लावली.फोटो,मेंदी, गाण्याच्या भेंड्या ह्यांनी घर भारलं.
    बघता बघता चार दिवस पार पडले ,कार्य उरकलं.दुस-या दिवशी बहिण निघणार म्हणाली तेव्हा जाणवलं,सुट्टी  संपली अन आता शाळा सुरु होणार रुटीनची. .
" तू आलीस खूप आधार वाटला..कार्य निभावलं",मी म्हणाले.
दोघींनाही गलबलून आलं...आता शेवटची संध्याकाळ अन गप्पा भैरवी बनल्या .काही आर्त तारा छेडल्या..काही  नवे आलाप जोडले..एकदा गळ्यात पडून स्फुंदत रडून  घेतलं.. भाते रिकामे झाले वाटेपर्यंत.
  आज धाकटी निघाली...पुन्हा आर्त मैफल जमेल..काहूर उठेल...हक्काने केलेला वाद,चेष्टा,तक्रारी संथ झाल्यात.हातातली बाहुली कुणीतरी मी बाहुलीशी गप्पा मारता मारता हिसकावून  घ्यावी आणि उंच फळीवर ठेवावी..तसं काहीसं..
ह्या भेटींना whatsapp नि fb काय भरुन काढणार ?
पण बहिणी पुन्हा  येतील सुट्टीला...सोबत माझं आणि त्यांच बालपण परत घेऊन...वर्षभर जीर्ण  झालेली कात काढून टाकायला.
       असं भरपूर बहिणभावंडानी समृध्द असावं..मनातलं सार बोलायला...भरपूर भांडायला...जगापासून लपवलेले सारे कोष फोडून पुन्हा फुलपाखरू व्हायला..
     अंहकाराच्या पलिकडे जाऊन जिवंत  राहावी हि चुलतमावस नाती...
"दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे"
Unknown Author 🙏​​

Sunday 11 February 2018


पति..
रागात येऊन...
सासूला sms पाठवतो..
“तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस अन्न बेचवच बनत आहे"
 .
.
.
.
.
.
.
.
.
सासू उत्तर देते..
 .
.
.
.
.
.
.
.
.
“तुम्ही वस्तू घेउन तीन वर्ष  झाले, वॉरंटी संपली. आता बिघडलेल्या वस्तूस उत्पादक जबाबदार नाही "
 😂😂😂😂😂😂

Saturday 10 February 2018


" *नीयत*" कितनी भी अच्छी हो,
दुनिया आपको आपके" *दिखावे*" से जानती है,
और " *दिखावा*" कितना भी अच्छा हो
" *ऊपरवाला*" आपको *नीयत* से जानता है....
*विश्वास* करनेसे पूर्व लोगोंको
अच्छी तरह *परख* लीजिये....
👉क्योंकि हम ऐसी *दुनियां* में रहते है,
जहाँ *नकली निम्बू* पानी
( *Limca, Sprite*)
से आपका  *स्वागत* होता है,
और असली *निम्बू* पानी
( *Finger bowl*)
*हाथ धोने* के लिए दिया जाता है।

          🙏​ *सुप्रभात* 🙏​
🍀 *आपका दिन मंगलमय हो* 🍀

Friday 9 February 2018

विरोधक आणि स्पर्धक . . 
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे,तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे.
 . . स्पर्धक व विरोधक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात.
   विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हांला कष्ट करावे लागत नाहीत .  . .
 . . समाज फुकटात त्यांना तुम्हाला देऊन टाकतो.त्यांच्यावर चिडू नका.त्यांचे कायम स्वागत करा. कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे . . !

Thursday 8 February 2018

तोच आठवडा त्यांच्यासाठी पण
🏻 "Rose" तर तिला पण द्या जी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.
🏻"Propose"तर तीला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते.
🏻"Chocolate" तर तीला पण द्या जी स्वतः झटुन तुम्हाला आयुष्यात"ready&set" करते.
🏻"Teddy" तर तीला पण द्या जी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारख जपत असते.
🏻"Promise" तर तीला पण करा जिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते.
🏻"Kiss" तर तीच्या पण पायांना करा जिने तुमच्यासाठी पाय झिजवले असते.
🏻"Hug" तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपले असते.
🏻"VALENTINE" तर तिच्या सोबत पण साजरा करा जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.
🏻"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.
तिचे नाव "आई"असते.
अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी असते.
🏻boyfriend नावाच्या "babu" आधि पण एक "बाबा" असतो.
त्याचे नाव "बाप" असते.
स्वतः चा खिसा रिकामा ठेवुन तुमच्यासाठी पैसे त्याच ATM मधुन येत असते.
Barobar na friends .....

Wednesday 7 February 2018


☂☂☂☂☂
*आयुष्य हे*
*एकदाच आहे* ,
*"मी"पणा नको,* 
*सर्वांशी प्रेमाने रहा...*
 *लोखंड वितळले की, औजार बनते*,
*सोने वितळले की,दागिने बनतात* ,
*माती नरम झाली की शेती बनते*,
*पीठ नरम झाले की पोळी बनते*,
*अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची  जागा बनते*" ?
☂आपला दिवस आनंदात जावो.☂
     *🙏​​​ शुभ सकाळ🙏​​​*👌

Tuesday 6 February 2018


🐜मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात...🙏​!!
           🌈मन शांती 🌈
म्हणून एका वेळेसच कोणतरी कोणाला चावणार

Monday 5 February 2018

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....
खरच मी इतका वाईट आहे का,
जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....
असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच वाटेला येत आहे,
खरच मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे ओरबाडत आहे.....
कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे.....
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले,
सगळेच वेळे नुसार बदलत आहे.....
कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि न केलेल्या पापाचीच शिक्षा मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहे......
अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहत आहे,
थोडी तरी कर रे कदर माझी,
हळू हळू श्वास माझे मिटत आहे......
हळू हळू श्वास माझे मिटत आहे..

Sunday 4 February 2018

ये मोबाइल यूँ ही हट्टा कट्टा नहीं बना
बहुत कुछ खाया - पीया है इसने
मसलन
ये हाथ की घड़ी खा गया
ये टॉर्च - लाईटे खा गया
ये चिट्ठी पत्रियाँ खा गया
ये किताब खा गया
ये रेडियो खा गया
ये टेप रिकॉर्डर खा गया
ये कैमरा खा गया
ये कैल्क्युलेटर खा गया
ये पड़ोस की दोस्ती खा गया
ये मेल - मिलाप खा गया
ये हमारा वक्त खा गया
ये हमारा सुकून खा गया
ये पैसे खा गया
ये रिश्ते खा गया
ये यादास्त खा गया
ये तंदुरूस्ती खा गया
कमबख्त
इतना कुछ खाकर ही स्मार्ट बना
बदलती दुनिया का ऐसा असर
होने लगा
आदमी पागल और फोन स्मार्ट
होने लगा
जब तक फोन वायर से बंधा था
इंसान आजाद था
जब से फोन आजाद हुआ है
इंसान फोन से बंध गया है
ऊँगलिया ही निभा रही रिश्ते
आजकल
जुवान से निभाने का वक्त कहाँ है
सब टच में बिजी है
पर टच में कोई नहीं है ।

Saturday 3 February 2018

My first post { Love Story }

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....
खरच मी इतका वाईट आहे का,
जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....
असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच वाटेला येत आहे,
खरच मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे ओरबाडत आहे.....
कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे.....
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले,
सगळेच वेळे नुसार बदलत आहे.....
कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि न केलेल्या पापाचीच शिक्षा मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहे......
अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहत आहे,
थोडी तरी कर रे कदर माझी,
हळू हळू श्वास माझे मिटत आहे......
हळू हळू श्वास माझे मिटत आहे..