Monday 9 April 2018

स्पर्शतृष्णा
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरूवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळू हळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं.माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शराराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले.काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा.पण एकंदरीने तेव्हा बाबा,वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा.बाबांच्
या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं.जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ,प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या.हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी 'बाजुला व्हा रे,किती अंगचटीला येता?जरा मोकळी राहू द्या ना मला ! '' असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर,मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता.तो घरी आला की मला भरतं यायचं.मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते,गळामिठी घालते अशावेळा स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील,मोकळेपणे बोलतील,जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत.त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी हून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत,मला त्यांचे लाड करू देतात पण.... जाणवतंच काहीतरी..आतल्या आत...!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली,''किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं! ''
तिच्या त्या व्याकुळ उद् गारात अर्थांचे डोंगर सामावले होते.मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ,वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे,मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्य
ा माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.
कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.
हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...
आज सकाळी पावणेआठचा सुमार.
बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
''हो. आपण? या ना.. '' मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.
'' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.
मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

Saturday 7 April 2018

मद्यपान आणि राशीचे स्वभाव....!
थोडेसेच ड्रींक का असेना
मेष आवडीने घेणार
गरम, चमचमीत चखण्या बरोबर ब्रँड वर
यांची पहिली नजर जाणार...!।।१।।
वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते...
पिण्या बरोबर चखणा नसला तरी
चार पाच पेग अगदी आरामात रिचवते...!।।२।।
कधी मारुनी चखण्या च्या मिटक्या
कधी नन्नाचा चाले पाढा...
मिथुनाचे कौतुक वेगळे
टाईट झाला तरी न कळे...! ।।३।।
'मद्य हे पूर्णब्रह्म' म्हणत
कर्केचे होते पूर्ण सेवन...
कडवट पण थंड बीअर
कसे पटकन करतात सेवन...! ।।४।।
राजरोस पणे पिण्याचा सिंहेचा
केवढा राजेशाही थाट...!
फूल खंबा घेतला तरी
यांची नाही लागत वाट...! ।।५।।
'कमी-जास्त नाही ना ?'
याची उगाच बाळगून भीती...!
इतरांकडे पाहून ठरते
कन्येची पिण्याची नीती...! ।।६।।
तंदूरी चिकन बरोबर
पचतील तेवढेच पेग...!
अशा संतुलित सेवना नंतर
तूळ खाते चिकन लेग...! ।।७।।
काही Missing आहे का
कधी कळतही नाही...!
साधी बीअर ही
वृश्चिकेला पचत नाही...! ।।८।।
कधी पटपट - झटपट पेग
तर कधी अगदीच वेळकाढू...!
धनू कधीच बिल भरत नाही
पण वेळ मिळताच संधीसाधू...!।।९।।
ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा...!
गपगुमान पितो मकर
करत नाही कधी थट्टा...! ।।१०।।
निश्चित वेळ पिण्याची
पार्टी असो वा एखादे लग्न...!
कुंभेची चिकित्सक वृत्ती
नेहमी मद्याचा ब्राण्ड जाणण्यात मग्न...!।।११।।
कधी - कुठेही जमते
मीनेची पिण्याशी गट्टी...!
पोटभर प्याल्यावर घेतात
'डाएट' नावाशी कट्टी...! ।।१२।।
आहे ना गंमत... !

Friday 6 April 2018

सवेंदनशीलता
आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं ते वॉट्स अप वर ऑनलाईन असताना. जगाच्या पाठीवर कुठेही असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक हे पुन्हा संपर्कात येतात आणि अगदी जवळच आहेत असं वाटतात. हे इतके लांब असलेले आपले जिवलग 'जस्ट वन क्लिक अवे' असतात. खूप छान वाटत की एकेकाळी एकत्र खेळत असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा भांवंड आता खूप काहीतरी उच्च शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उंच भराऱ्या मारत असतात. जेंव्हा असा जुना जिवलगांचा ग्रुप फॉर्म होतो तेंव्हा रोजच्या काहीतरी गप्पा चालू होतात. कोण कोण काय काय करतंय, कुठे आहे, सगळं शेअर होतं अगदी पूर्वीसारखं. थोडे दिवस हे सगळं खूप छान चालू असतं मग बोलायचे विषय संपतात आणि चालू होतो फॉरवर्ड चा सिलसिला. मग त्यात वेगळे वेगळे लेख, शुभेच्छा, जोक्स चालू होतात.
वॉट्स ऍप वरच्या जोक्स चे विषय हे तर ठरलेलेच. ते म्हणजे अनुक्रमे बायको, पुणे, गुरुजी, राजकीय नेते. खरंतर ह्यातील कोणताही विषय विनोदाचा आहे असं मी तरी मानत नाही. त्याचं कारण मी पुण्याची आहे किंवा कोणाची तरी बायको आहे हे नक्कीच नाही. (स्वतःवर केलेले विनोद पचवण्याची विनोदबुद्धी माझ्यात नक्कीच आहे.) पण विनोदाला एक दर्जा असावा ह्या मताची मी आहे.
बायको वरचे जोक्स हे जेंव्हा तिच्या मृत्यू पर्यंत गेले तेंव्हा मात्र ते खरंच डोक्यात गेले. प्रश्न मी एक बायको आहे म्हणून नाही तर आपली असंवेदनशीलता इतक्या खालच्या थराला पोहोचलेली आहे की आपण एखाद्याच्या मृत्यूवर जोक करतो? लहानपणापासून घरातली गृहिणी ही घराचा एक भक्कम आधार असते हे ऐकत बघत आलोय. आपली आई आपलं अख्ख घर स्वतःचा स्व विसरून सांभाळत असते हे बघितलंय आणि तिचा आदर मात्र फक्त वूमनस डे किंवा मदर्स डे पुरता? आणि हे दिवस संपले की उरलेलं वर्ष तिच्यावरचे जोक्स? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या फॉरवर्ड करणाऱ्या लोकांमध्ये फक्त तरुण वर्ग नाही तर वयस्क लोकं पण आहेत आणि खुद्द बायका पण आहेत. खरंतर ह्याच पिढीनी आम्हाला आदर करायला शिकवलाय तो आई वडिलांचा, गुरुजनांचा, नेत्यांचा. मग इथे तुमची शिकवण कुठे जाते. इथे मला एक प्रश्न पडतोय की वॉट्स ऍप वर मेसेजेस टाकणे हे तुमच्या ऍक्टिव्ह असण्याचे किंवा काळाप्रमाणे चालण्याचे लक्षण का समजलं जातंय? एखादी पोस्ट मला आलीये ती मला पटो न पटो मी ती दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड करणार ही एक सवय झालीये. एकदा एका बाईनीच मला सांगितलं, "इतकं सिरिअसली घेऊ नकोस ग". आमच्या पिढीच्या संस्कारक्षम वयात हे प्रकार नव्हते म्हणून ठीक. पण आत्ताच्या मुलांच्या संस्कारक्षम वयात आपण त्यांना हे वाचायला देतोय. ह्याचा कुठे ना कुठे त्यांच्या मनावर परिणाम होतो हे नक्की.
माझी बायको बस चुकल्यामुळे वाचली म्हणून नवरा रडतोय, बायकोच्या मोबाईल मध्ये ब्लु व्हेल डाउनलोड केल्यावर ब्लु व्हेल मेला, नागीण विष मिळवण्यासाठी बायको कडे येते. ही असली वाक्यं आपल्याला जोक्स चा आनंद देतात? आणि जर खरंच देत असतील तर ही गंभीर बाब आहे. आपण हीच शिकवण पुढच्या पिढी ला कळत नकळत देतोय. कारण आज वॉट्स ऍप हे किशोरवयीन मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळेच वापरत आहेत. आणि मग हल्ली लग्न टिकत नाहीत म्हणून पुढच्या पिढीला दोष देणारे पण आपणच. लहानपणापासून 'सुसंगती सदा घडो' हे ऐकत आलेले आपण मुलांना मात्र सदैव एखाद्या नात्याची, गावाची किंवा पदाची काळी बाजूच दाखवून मोठं करतोय.
दुसरा जोक्स करायचा आवडता विषय म्हणजे 'पुणे'. पक्की पुणेरी असल्याने आणि त्याचा जाज्वल्य अभिमान असल्याने हे जोक्स सहन करणे खरंच कठीण आहे माझ्यासाठी. (पुन्हा विनोदबुद्धीची कमतरता म्हणून न्हवे तर त्या जोक्स च्या दर्जा खूप हीन आहे म्हणून.) प्रत्येक गावाची एक आपली जीवनशैली आहे. ती त्याच्या भॊगोलिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे तयार झाली असते. पुणेरी पाट्या बघितल्या तेंव्हा खूप मजा वाटली सुरुवातीला आणि आपल्या लोकांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक पण वाटले. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' ह्याप्रमाणे त्याच्या छटा बघताना खरंच मनोरंजन होतं. पण मन हललं ते काही विशिष्ट पाट्यांनी.
'तेराव्याची जेवणाची ऑर्डर स्वीकारू पण पंधरा दिवस आधी बुकिंग करावे' एका तरी माणसांनी ही पाटी मला पुण्यात शोधून दाखवावी. 'एका वयस्क आजोबांना आधार कार्ड थोडक्यासाठी कशाला काढताय हे पुण्यात उत्तर मिळतं.' 'औषधांची एक्सपायरी डेट माहित आहे पण तुमची नाही. तरी उधार मागू नये' इतके हीन दर्जाचे जोक्स बघितले की खऱ्या पुणेकराला राग आल्याशिवाय राहणारच नाही. मुख्य म्हणजे पुण्यात बरेच वर्ष राहणारी लोकं हे असले जोक्स फॉरवर्ड करतात आणि वर परत म्हणतात की आम्ही मूळचे पुण्याचे नाही. ज्या शहरांनी त्यांना डिग्री, नोकरी, छत्र दिलं त्या शहराला तुम्ही सोयीस्कर रित्या आपलं आणि परकं करता. इतके कृतघ्न लोकं महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराचे? असा प्रश्न केल्यावर स्वतःच्या शहराचे नाव न सांगता आता पुण्याचेच आहोत असं सांगतील. पण जेंव्हा त्याच पुण्यावर जोक्स होतील तेंव्हा हे सगळे पुन्हा आपापल्या गावात पोहोचतील. "आपलं मत स्पष्टपणे मांडायला आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायला हिम्मत लागते. ती एका फक्त स्पष्टवक्त्या पुणेकरताच आहे" असं वक्तव्य मी केल्यास ते चुकीचा ठरू नये. असो ह्याबाबत लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण ही पोस्ट पुण्यासाठी नाही तर संवेदनशीलते बद्दल आहे. इथे पुन्हा तेच होतंय.
तिसरा विषय तर जोक्स साठी कसा असू शकतो हेच मला कळत नाही. आजही रस्त्यात शाळेतले कोणतेही शिक्षक दिसले तर पटकन पाया पडणारे आम्ही त्यांच्या मागे सरळ सरळ त्यांच्यावर वाट्टेल ते जोक्स पाठवतो. (मात्र गुरु पौर्णिमा आणि टीचर्स डे सोडून हं! त्या दिवशी आमचा आदर खूपच उफाळून येतो.) त्यात सुद्धा काय तर 'गुरुजी पळाले', गुरुजी तुम्ही चड्डी का काढताय', गुरुजींनी शाळा सोडली', 'गुरुजी वारले' शी! आपली पातळी किती खालावतोय आपणच. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की हे जोक्स पाठवणारे सुद्धा सगळ्या पिढ्यांमध्ये सापडतील. ज्या पिढीने खरंतर गुरुजनांचा बरोबरीने आम्हाला घडवलं ते सुद्धा असे जोक्स पाठवतात.
हे सगळं लिहिण्याचं कारण की आपल्यातली संवेदनशीलता संपलीये की सदसद्विवेकबुद्धी? हा प्रश्न मला पडतोय. एखादा जोक आला की त्यावर काहीच विचार न करता आपण कसा काय फॉरवर्ड करू शकतो. किंवा मग 'इधर का माल उधर' करण्याच्या शर्यतीत ही आपण भाग घेतोय. पुन्हा काही बोललं की 'व्यक्ती स्वातंत्र्य' नावाची ढाल पुढे करता येतेच की! (विशेष सूचना: ही ढाल फक्त जोक पाठवणारे वापरू शकतील. ते न आवडल्यास प्रतिक्रिया देणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही.)
मी सुरवातीलाच लिहिल्याप्रमाणे खरंच खूप काही सुंदर अनुभव किंवा लिखाण शेअर करण्यासाठी आपण वॉट्स ऍप किंवा फेसबुक चा उपयोग करू शकतो. पण जेंव्हा त्याच्या आहारी जाऊन लोकं ' जस्ट फॉर द सेक ऑफ मेसेजिंग' काहीही फॉरवर्ड करतात तेंव्हा खूप वाईट वाटतं आणि काळजीही वाटते. स्मार्ट फोन आणि इंटरनेट चा सुळसुळाट होण्याच्या आधी खरंच खूप सोपा होतं आयुष्य. इंटरनेट च्या फायद्याबरोबर 'सोशल प्रेशर' नावाचा बागुलबुवा आला आणि आपल्याच पुढच्या पिढ्यांची वाट लावायला निघाला. (वॉट्स ऍप आणि फेसबुक वर असणे हे सुद्धा सोशल प्रेशर आहे अलीकडे).
आपल्या पुढच्या पिढ्यांची काळजी आपल्यालाच करायची आहे आणि त्यांच्या समोर आपणच आदर्श उभा करायचाय. तेंव्हा 'आदर' ही भावना जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर कृपया असे कोणतेही जोक्स फॉरवर्ड करताना एकदा पुन्हा विचार करा ही नम्र विनंती.

Thursday 5 April 2018


अच्छे दिन कब आयेंगे ??????????
बन्दरों का एक समूह था, जो फलो के बगिचों मे फल तोड़ कर खाया करते थे। माली की मार और डन्डे भी खाते थे, रोज पिटते थे ।
उनका एक सरदार भी था जो सभी बंदरो से ज्यादा समझदार था। एक दिन बन्दरों के कर्मठ और जुझारू सरदार ने सब बन्दरों से विचार-विमर्श कर निश्चय किया कि रोज माली के डन्डे खाने से बेहतर है कि यदि हम अपना फलों का बगीचा लगा लें तो इतने फल मिलेंगे की हर एक के हिस्से मे 15-15 फल आ सकते है, हमे फल खाने मे कोई रोक टोक भी नहीं होगी और हमारे #अच्छेदिन आ जाएंगे।
सभी बन्दरों को यह प्रस्ताव बहुत पसन्द आया। जोर शोर से गड्ढे खोद कर फलो के बीज बो दिये गये।
पूरी रात बन्दरों ने बेसब्री से इन्तज़ार किया और सुबह देखा तो फलो के पौधे भी नहीं आये थे ! जिसे देखकर बंदर भड़क गए और सरदार को गरियाने लगे और नारे लगाने लगे, "कहा है हमारे 15-15 फल", "क्या यही अच्छे दिन है?"। सरदार ने इनकी मुर्खता पर अपना सिर पीट लिया और हाथ जोड़कर प्रार्थना करते हुए बोला, "भाईयो और बहनो, अभी तो हमने बीज बोया है, मुझे थोड़ा समय और दे दो, फल आने मे थोड़ा समय लगता है।" इस बार तो बंदर मान गए।
दो चार दिन बन्दरों ने और इन्तज़ार किया, परन्तु पौधे नहीं आये, अब मुर्ख बन्दरों से नही रहा गया तो उन्होंने मिट्टी हटाई - देखा फलो के बीज जैसे के तैसे मिले ।
बन्दरों ने कहा - सरदार फेकु है, झूठ बोलते हैं। हमारे कभी अच्छे दिन नही आने वाले। हमारी किस्मत में तो माली के डन्डे ही लिखे हैं और बन्दरों ने सभी गड्ढे खोद कर फलो के बीज निकाल निकाल कर फेंक दिये। पुन: अपने भोजन के लिये माली की मार और डन्डे खाने लगे।
- जरा सोचना कहीं आप बन्दरों वाली हरकत तो नहीं कर रहे हो?
60 वर्ष.......4 वर्ष
एक परिपक्व समाज का उदाहरण पेश करिये बन्दरों जैसी हरकत मत करिये...
देश धीरे धीरे बदल रहा है नई नई ऊंचाइयां छू रहा है, जो भी जोखिम भरे कदम बहुत पहले ले लेने चाहिए थे, वह अब लिये जा रहे हें आवश्यकता है तो सिर्फ और सिर्फ साथ की क्योंकि बहुत बड़े बड़े काम होने अभी बाकी हैं, धीरज रखिए।
वन्देमातरम्। जय हिंद ..

Wednesday 4 April 2018

*शेवटी सासर कोणाचे..?*
सकाळी सकाळी आमच्या शेजारच्या काकू तिच्या सुनेला झापत होती..
"तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे, इथं तुझं नाही माझाच चालेल.."
सुनबाई प्रेमाने बोलली: "आई! माहेर तर हे तुमचंही नाही..
तुमचंही सासरचं आहे की,
मग तुमचंच कसं चालेल..?"
सासुबाई अजून शांत आहेत

Tuesday 3 April 2018


प्रवास तसा रोजचाच होता......
बस मधे धक्के खात जीव माझा घाबरत होता......
रोज मरे त्याला कोण रडे होती अशी गत.....
लोकांच्या गर्दीत जागा नव्हति मांडायला मत......
वाटायच सगळी दुःख माझ्याच वाट्याला का....
मी सहन करतो म्हणून तर नाही ना......
तेवढ्यात गर्दीत कोणाचा तरी
धक्का लागला मला.....
सॉरी ह....म्हणून चिमुकला
घासून गेला मला.....
10-12 वर्षाच पोर ते निरागस.....
कृष्णा सारख अवखळ शरीराने सकस......
डोळे फुटले का तुझे..
रागात ओरडलो मी......
मागे फिरून बघता त्याने
शरमेने पाणी पाणी झालो म़ी......
हो म्हणत black goggle काढला त्याने डोळ्यावरुन.....
डोळ्यात बघता त्याच्या टच कन पाणी व्हाहिल गालावरून......
माफ़ी माघायला ही मी पुढे धजेना.....
काहुर दाटल मनात शब्द काही सुचेना......
उशीर झाला कामाला म्हणून घाई करतोय......
जगण्याच्या शर्यतीत जणू रोजच म़ी हरतोय.....
दप्तराएवजी तेलाने माखलेला डब्बा म़ी पहिला.....
आणि डोळ्यासमोर एक आदर्श मुलगा लगेच उभा राहिला.....
आई त्याची आजारी आहे कुजबुज गर्दित झाली....
न दिसताना ही खाली गेलेली मान त्याने पहिली.....
स्टॉप वर उतरताना काठी त्याने जमिनीवर ठेवली......
आणि आणि तेवढ्यात कर्र आवाजाने बस आमची थांबली.....
एक भरधाव ट्रक चिरडून त्याला गेला.....
आणि लहान वयातच कामाचा प्रवास त्याचा कायमचा संपला.....
आई आई हाक मारत श्वास त्याने सोडला.....
काळजाला चिर्र करणारा आवाज माझ्या कानाताच थांबला.....
काय होणार त्या आईच विचार मनात आला.....
वाटल का आला ह्या बस मधे आता कायमचाच उशीर झाला.....
चीड आली मला क्षणातच माझ्या ज़िन्दगिवर......
वाटल नको मागे बघायला आयुष्याच्या वळनावर.....
आयुष्याच्या वळनावर .....

Monday 2 April 2018

तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??
नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात....
साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,
पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही कारणाने आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो.....
बापरे,,,, हि माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळाली आणि मी अस्वस्थ झाले...
हा विषय मनातून जाईना....!
इतके प्रेम......!!
इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का.......????
Great..........¡¡
शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही....
पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो....
हे जग वेगळेच आहे.....
...
.....
.......
रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात....
मला खुप आवडत त्यांच्याकडे पहायला.
....
....
बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात.......
दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक........
मोठ्यांदा बोलतात.
..
आजोबा काहीतरी विचारतात...
आज्जी वेगळेच ऐकतात....
मग...
काहीतरी बोलतात....
....
ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात....
..
...
....
मला त्यांच्यात शहामृग दिसतो.
मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्व ला नाटक बघायला जाते तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच.
आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो...
आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्ट मध्ये असतात.
आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात......
मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात......
बटाटेवडा खातात...
कॉफी पितात मग परत नाटक पाहायला आत येतात....
नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात.........
....
......
किती रसिक,
म्हातारपण आहे हे....!!
...
एकदा मिलिंद इगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते,
तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधीक शहामृगाच्या जोड्याच होत्या......
....
यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय...!
उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही....
पुण्यातले आजीआजोबा अभीं तो,
'मै जवान हूं' या मानसिकतेतच राहतात नव्हे तसे जगतात...
...
माझं काय आता.... वय झालं.
संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,
my God,,,
इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात.....
...
*वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते - तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल .*
*किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!!*
*छानच नां ........!!!!!!!!*