Monday 9 April 2018

स्पर्शतृष्णा
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरूवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळू हळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं.माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शराराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले.काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा.पण एकंदरीने तेव्हा बाबा,वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा.बाबांच्
या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं.जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ,प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या.हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी 'बाजुला व्हा रे,किती अंगचटीला येता?जरा मोकळी राहू द्या ना मला ! '' असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर,मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता.तो घरी आला की मला भरतं यायचं.मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते,गळामिठी घालते अशावेळा स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील,मोकळेपणे बोलतील,जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत.त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी हून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत,मला त्यांचे लाड करू देतात पण.... जाणवतंच काहीतरी..आतल्या आत...!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली,''किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं! ''
तिच्या त्या व्याकुळ उद् गारात अर्थांचे डोंगर सामावले होते.मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ,वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे,मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्य
ा माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.
कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.
हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...
आज सकाळी पावणेआठचा सुमार.
बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
''हो. आपण? या ना.. '' मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.
'' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.
मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

Saturday 7 April 2018

मद्यपान आणि राशीचे स्वभाव....!
थोडेसेच ड्रींक का असेना
मेष आवडीने घेणार
गरम, चमचमीत चखण्या बरोबर ब्रँड वर
यांची पहिली नजर जाणार...!।।१।।
वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते...
पिण्या बरोबर चखणा नसला तरी
चार पाच पेग अगदी आरामात रिचवते...!।।२।।
कधी मारुनी चखण्या च्या मिटक्या
कधी नन्नाचा चाले पाढा...
मिथुनाचे कौतुक वेगळे
टाईट झाला तरी न कळे...! ।।३।।
'मद्य हे पूर्णब्रह्म' म्हणत
कर्केचे होते पूर्ण सेवन...
कडवट पण थंड बीअर
कसे पटकन करतात सेवन...! ।।४।।
राजरोस पणे पिण्याचा सिंहेचा
केवढा राजेशाही थाट...!
फूल खंबा घेतला तरी
यांची नाही लागत वाट...! ।।५।।
'कमी-जास्त नाही ना ?'
याची उगाच बाळगून भीती...!
इतरांकडे पाहून ठरते
कन्येची पिण्याची नीती...! ।।६।।
तंदूरी चिकन बरोबर
पचतील तेवढेच पेग...!
अशा संतुलित सेवना नंतर
तूळ खाते चिकन लेग...! ।।७।।
काही Missing आहे का
कधी कळतही नाही...!
साधी बीअर ही
वृश्चिकेला पचत नाही...! ।।८।।
कधी पटपट - झटपट पेग
तर कधी अगदीच वेळकाढू...!
धनू कधीच बिल भरत नाही
पण वेळ मिळताच संधीसाधू...!।।९।।
ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा...!
गपगुमान पितो मकर
करत नाही कधी थट्टा...! ।।१०।।
निश्चित वेळ पिण्याची
पार्टी असो वा एखादे लग्न...!
कुंभेची चिकित्सक वृत्ती
नेहमी मद्याचा ब्राण्ड जाणण्यात मग्न...!।।११।।
कधी - कुठेही जमते
मीनेची पिण्याशी गट्टी...!
पोटभर प्याल्यावर घेतात
'डाएट' नावाशी कट्टी...! ।।१२।।
आहे ना गंमत... !

Friday 6 April 2018

सवेंदनशीलता
आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं ते वॉट्स अप वर ऑनलाईन असताना. जगाच्या पाठीवर कुठेही असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक हे पुन्हा संपर्कात येतात आणि अगदी जवळच आहेत असं वाटतात. हे इतके लांब असलेले आपले जिवलग 'जस्ट वन क्लिक अवे' असतात. खूप छान वाटत की एकेकाळी एकत्र खेळत असलेले आपले मित्रमैत्रिणी किंवा भांवंड आता खूप काहीतरी उच्च शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उंच भराऱ्या मारत असतात. जेंव्हा असा जुना जिवलगांचा ग्रुप फॉर्म होतो तेंव्हा रोजच्या काहीतरी गप्पा चालू होतात. कोण कोण काय काय करतंय, कुठे आहे, सगळं शेअर होतं अगदी पूर्वीसारखं. थोडे दिवस हे सगळं खूप छान चालू असतं मग बोलायचे विषय संपतात आणि चालू होतो फॉरवर्ड चा सिलसिला. मग त्यात वेगळे वेगळे लेख, शुभेच्छा, जोक्स चालू होतात.
वॉट्स ऍप वरच्या जोक्स चे विषय हे तर ठरलेलेच. ते म्हणजे अनुक्रमे बायको, पुणे, गुरुजी, राजकीय नेते. खरंतर ह्यातील कोणताही विषय विनोदाचा आहे असं मी तरी मानत नाही. त्याचं कारण मी पुण्याची आहे किंवा कोणाची तरी बायको आहे हे नक्कीच नाही. (स्वतःवर केलेले विनोद पचवण्याची विनोदबुद्धी माझ्यात नक्कीच आहे.) पण विनोदाला एक दर्जा असावा ह्या मताची मी आहे.
बायको वरचे जोक्स हे जेंव्हा तिच्या मृत्यू पर्यंत गेले तेंव्हा मात्र ते खरंच डोक्यात गेले. प्रश्न मी एक बायको आहे म्हणून नाही तर आपली असंवेदनशीलता इतक्या खालच्या थराला पोहोचलेली आहे की आपण एखाद्याच्या मृत्यूवर जोक करतो? लहानपणापासून घरातली गृहिणी ही घराचा एक भक्कम आधार असते हे ऐकत बघत आलोय. आपली आई आपलं अख्ख घर स्वतःचा स्व विसरून सांभाळत असते हे बघितलंय आणि तिचा आदर मात्र फक्त वूमनस डे किंवा मदर्स डे पुरता? आणि हे दिवस संपले की उरलेलं वर्ष तिच्यावरचे जोक्स? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या फॉरवर्ड करणाऱ्या लोकांमध्ये फक्त तरुण वर्ग नाही तर वयस्क लोकं पण आहेत आणि खुद्द बायका पण आहेत. खरंतर ह्याच पिढीनी आम्हाला आदर करायला शिकवलाय तो आई वडिलांचा, गुरुजनांचा, नेत्यांचा. मग इथे तुमची शिकवण कुठे जाते. इथे मला एक प्रश्न पडतोय की वॉट्स ऍप वर मेसेजेस टाकणे हे तुमच्या ऍक्टिव्ह असण्याचे किंवा काळाप्रमाणे चालण्याचे लक्षण का समजलं जातंय? एखादी पोस्ट मला आलीये ती मला पटो न पटो मी ती दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड करणार ही एक सवय झालीये. एकदा एका बाईनीच मला सांगितलं, "इतकं सिरिअसली घेऊ नकोस ग". आमच्या पिढीच्या संस्कारक्षम वयात हे प्रकार नव्हते म्हणून ठीक. पण आत्ताच्या मुलांच्या संस्कारक्षम वयात आपण त्यांना हे वाचायला देतोय. ह्याचा कुठे ना कुठे त्यांच्या मनावर परिणाम होतो हे नक्की.
माझी बायको बस चुकल्यामुळे वाचली म्हणून नवरा रडतोय, बायकोच्या मोबाईल मध्ये ब्लु व्हेल डाउनलोड केल्यावर ब्लु व्हेल मेला, नागीण विष मिळवण्यासाठी बायको कडे येते. ही असली वाक्यं आपल्याला जोक्स चा आनंद देतात? आणि जर खरंच देत असतील तर ही गंभीर बाब आहे. आपण हीच शिकवण पुढच्या पिढी ला कळत नकळत देतोय. कारण आज वॉट्स ऍप हे किशोरवयीन मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळेच वापरत आहेत. आणि मग हल्ली लग्न टिकत नाहीत म्हणून पुढच्या पिढीला दोष देणारे पण आपणच. लहानपणापासून 'सुसंगती सदा घडो' हे ऐकत आलेले आपण मुलांना मात्र सदैव एखाद्या नात्याची, गावाची किंवा पदाची काळी बाजूच दाखवून मोठं करतोय.
दुसरा जोक्स करायचा आवडता विषय म्हणजे 'पुणे'. पक्की पुणेरी असल्याने आणि त्याचा जाज्वल्य अभिमान असल्याने हे जोक्स सहन करणे खरंच कठीण आहे माझ्यासाठी. (पुन्हा विनोदबुद्धीची कमतरता म्हणून न्हवे तर त्या जोक्स च्या दर्जा खूप हीन आहे म्हणून.) प्रत्येक गावाची एक आपली जीवनशैली आहे. ती त्याच्या भॊगोलिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे तयार झाली असते. पुणेरी पाट्या बघितल्या तेंव्हा खूप मजा वाटली सुरुवातीला आणि आपल्या लोकांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक पण वाटले. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' ह्याप्रमाणे त्याच्या छटा बघताना खरंच मनोरंजन होतं. पण मन हललं ते काही विशिष्ट पाट्यांनी.
'तेराव्याची जेवणाची ऑर्डर स्वीकारू पण पंधरा दिवस आधी बुकिंग करावे' एका तरी माणसांनी ही पाटी मला पुण्यात शोधून दाखवावी. 'एका वयस्क आजोबांना आधार कार्ड थोडक्यासाठी कशाला काढताय हे पुण्यात उत्तर मिळतं.' 'औषधांची एक्सपायरी डेट माहित आहे पण तुमची नाही. तरी उधार मागू नये' इतके हीन दर्जाचे जोक्स बघितले की खऱ्या पुणेकराला राग आल्याशिवाय राहणारच नाही. मुख्य म्हणजे पुण्यात बरेच वर्ष राहणारी लोकं हे असले जोक्स फॉरवर्ड करतात आणि वर परत म्हणतात की आम्ही मूळचे पुण्याचे नाही. ज्या शहरांनी त्यांना डिग्री, नोकरी, छत्र दिलं त्या शहराला तुम्ही सोयीस्कर रित्या आपलं आणि परकं करता. इतके कृतघ्न लोकं महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराचे? असा प्रश्न केल्यावर स्वतःच्या शहराचे नाव न सांगता आता पुण्याचेच आहोत असं सांगतील. पण जेंव्हा त्याच पुण्यावर जोक्स होतील तेंव्हा हे सगळे पुन्हा आपापल्या गावात पोहोचतील. "आपलं मत स्पष्टपणे मांडायला आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायला हिम्मत लागते. ती एका फक्त स्पष्टवक्त्या पुणेकरताच आहे" असं वक्तव्य मी केल्यास ते चुकीचा ठरू नये. असो ह्याबाबत लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण ही पोस्ट पुण्यासाठी नाही तर संवेदनशीलते बद्दल आहे. इथे पुन्हा तेच होतंय.
तिसरा विषय तर जोक्स साठी कसा असू शकतो हेच मला कळत नाही. आजही रस्त्यात शाळेतले कोणतेही शिक्षक दिसले तर पटकन पाया पडणारे आम्ही त्यांच्या मागे सरळ सरळ त्यांच्यावर वाट्टेल ते जोक्स पाठवतो. (मात्र गुरु पौर्णिमा आणि टीचर्स डे सोडून हं! त्या दिवशी आमचा आदर खूपच उफाळून येतो.) त्यात सुद्धा काय तर 'गुरुजी पळाले', गुरुजी तुम्ही चड्डी का काढताय', गुरुजींनी शाळा सोडली', 'गुरुजी वारले' शी! आपली पातळी किती खालावतोय आपणच. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की हे जोक्स पाठवणारे सुद्धा सगळ्या पिढ्यांमध्ये सापडतील. ज्या पिढीने खरंतर गुरुजनांचा बरोबरीने आम्हाला घडवलं ते सुद्धा असे जोक्स पाठवतात.
हे सगळं लिहिण्याचं कारण की आपल्यातली संवेदनशीलता संपलीये की सदसद्विवेकबुद्धी? हा प्रश्न मला पडतोय. एखादा जोक आला की त्यावर काहीच विचार न करता आपण कसा काय फॉरवर्ड करू शकतो. किंवा मग 'इधर का माल उधर' करण्याच्या शर्यतीत ही आपण भाग घेतोय. पुन्हा काही बोललं की 'व्यक्ती स्वातंत्र्य' नावाची ढाल पुढे करता येतेच की! (विशेष सूचना: ही ढाल फक्त जोक पाठवणारे वापरू शकतील. ते न आवडल्यास प्रतिक्रिया देणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही.)
मी सुरवातीलाच लिहिल्याप्रमाणे खरंच खूप काही सुंदर अनुभव किंवा लिखाण शेअर करण्यासाठी आपण वॉट्स ऍप किंवा फेसबुक चा उपयोग करू शकतो. पण जेंव्हा त्याच्या आहारी जाऊन लोकं ' जस्ट फॉर द सेक ऑफ मेसेजिंग' काहीही फॉरवर्ड करतात तेंव्हा खूप वाईट वाटतं आणि काळजीही वाटते. स्मार्ट फोन आणि इंटरनेट चा सुळसुळाट होण्याच्या आधी खरंच खूप सोपा होतं आयुष्य. इंटरनेट च्या फायद्याबरोबर 'सोशल प्रेशर' नावाचा बागुलबुवा आला आणि आपल्याच पुढच्या पिढ्यांची वाट लावायला निघाला. (वॉट्स ऍप आणि फेसबुक वर असणे हे सुद्धा सोशल प्रेशर आहे अलीकडे).
आपल्या पुढच्या पिढ्यांची काळजी आपल्यालाच करायची आहे आणि त्यांच्या समोर आपणच आदर्श उभा करायचाय. तेंव्हा 'आदर' ही भावना जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर कृपया असे कोणतेही जोक्स फॉरवर्ड करताना एकदा पुन्हा विचार करा ही नम्र विनंती.

Thursday 5 April 2018


अच्छे दिन कब आयेंगे ??????????
बन्दरों का एक समूह था, जो फलो के बगिचों मे फल तोड़ कर खाया करते थे। माली की मार और डन्डे भी खाते थे, रोज पिटते थे ।
उनका एक सरदार भी था जो सभी बंदरो से ज्यादा समझदार था। एक दिन बन्दरों के कर्मठ और जुझारू सरदार ने सब बन्दरों से विचार-विमर्श कर निश्चय किया कि रोज माली के डन्डे खाने से बेहतर है कि यदि हम अपना फलों का बगीचा लगा लें तो इतने फल मिलेंगे की हर एक के हिस्से मे 15-15 फल आ सकते है, हमे फल खाने मे कोई रोक टोक भी नहीं होगी और हमारे #अच्छेदिन आ जाएंगे।
सभी बन्दरों को यह प्रस्ताव बहुत पसन्द आया। जोर शोर से गड्ढे खोद कर फलो के बीज बो दिये गये।
पूरी रात बन्दरों ने बेसब्री से इन्तज़ार किया और सुबह देखा तो फलो के पौधे भी नहीं आये थे ! जिसे देखकर बंदर भड़क गए और सरदार को गरियाने लगे और नारे लगाने लगे, "कहा है हमारे 15-15 फल", "क्या यही अच्छे दिन है?"। सरदार ने इनकी मुर्खता पर अपना सिर पीट लिया और हाथ जोड़कर प्रार्थना करते हुए बोला, "भाईयो और बहनो, अभी तो हमने बीज बोया है, मुझे थोड़ा समय और दे दो, फल आने मे थोड़ा समय लगता है।" इस बार तो बंदर मान गए।
दो चार दिन बन्दरों ने और इन्तज़ार किया, परन्तु पौधे नहीं आये, अब मुर्ख बन्दरों से नही रहा गया तो उन्होंने मिट्टी हटाई - देखा फलो के बीज जैसे के तैसे मिले ।
बन्दरों ने कहा - सरदार फेकु है, झूठ बोलते हैं। हमारे कभी अच्छे दिन नही आने वाले। हमारी किस्मत में तो माली के डन्डे ही लिखे हैं और बन्दरों ने सभी गड्ढे खोद कर फलो के बीज निकाल निकाल कर फेंक दिये। पुन: अपने भोजन के लिये माली की मार और डन्डे खाने लगे।
- जरा सोचना कहीं आप बन्दरों वाली हरकत तो नहीं कर रहे हो?
60 वर्ष.......4 वर्ष
एक परिपक्व समाज का उदाहरण पेश करिये बन्दरों जैसी हरकत मत करिये...
देश धीरे धीरे बदल रहा है नई नई ऊंचाइयां छू रहा है, जो भी जोखिम भरे कदम बहुत पहले ले लेने चाहिए थे, वह अब लिये जा रहे हें आवश्यकता है तो सिर्फ और सिर्फ साथ की क्योंकि बहुत बड़े बड़े काम होने अभी बाकी हैं, धीरज रखिए।
वन्देमातरम्। जय हिंद ..

Wednesday 4 April 2018

*शेवटी सासर कोणाचे..?*
सकाळी सकाळी आमच्या शेजारच्या काकू तिच्या सुनेला झापत होती..
"तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे, इथं तुझं नाही माझाच चालेल.."
सुनबाई प्रेमाने बोलली: "आई! माहेर तर हे तुमचंही नाही..
तुमचंही सासरचं आहे की,
मग तुमचंच कसं चालेल..?"
सासुबाई अजून शांत आहेत

Tuesday 3 April 2018


प्रवास तसा रोजचाच होता......
बस मधे धक्के खात जीव माझा घाबरत होता......
रोज मरे त्याला कोण रडे होती अशी गत.....
लोकांच्या गर्दीत जागा नव्हति मांडायला मत......
वाटायच सगळी दुःख माझ्याच वाट्याला का....
मी सहन करतो म्हणून तर नाही ना......
तेवढ्यात गर्दीत कोणाचा तरी
धक्का लागला मला.....
सॉरी ह....म्हणून चिमुकला
घासून गेला मला.....
10-12 वर्षाच पोर ते निरागस.....
कृष्णा सारख अवखळ शरीराने सकस......
डोळे फुटले का तुझे..
रागात ओरडलो मी......
मागे फिरून बघता त्याने
शरमेने पाणी पाणी झालो म़ी......
हो म्हणत black goggle काढला त्याने डोळ्यावरुन.....
डोळ्यात बघता त्याच्या टच कन पाणी व्हाहिल गालावरून......
माफ़ी माघायला ही मी पुढे धजेना.....
काहुर दाटल मनात शब्द काही सुचेना......
उशीर झाला कामाला म्हणून घाई करतोय......
जगण्याच्या शर्यतीत जणू रोजच म़ी हरतोय.....
दप्तराएवजी तेलाने माखलेला डब्बा म़ी पहिला.....
आणि डोळ्यासमोर एक आदर्श मुलगा लगेच उभा राहिला.....
आई त्याची आजारी आहे कुजबुज गर्दित झाली....
न दिसताना ही खाली गेलेली मान त्याने पहिली.....
स्टॉप वर उतरताना काठी त्याने जमिनीवर ठेवली......
आणि आणि तेवढ्यात कर्र आवाजाने बस आमची थांबली.....
एक भरधाव ट्रक चिरडून त्याला गेला.....
आणि लहान वयातच कामाचा प्रवास त्याचा कायमचा संपला.....
आई आई हाक मारत श्वास त्याने सोडला.....
काळजाला चिर्र करणारा आवाज माझ्या कानाताच थांबला.....
काय होणार त्या आईच विचार मनात आला.....
वाटल का आला ह्या बस मधे आता कायमचाच उशीर झाला.....
चीड आली मला क्षणातच माझ्या ज़िन्दगिवर......
वाटल नको मागे बघायला आयुष्याच्या वळनावर.....
आयुष्याच्या वळनावर .....

Monday 2 April 2018

तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??
नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात....
साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,
पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही कारणाने आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो.....
बापरे,,,, हि माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळाली आणि मी अस्वस्थ झाले...
हा विषय मनातून जाईना....!
इतके प्रेम......!!
इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का.......????
Great..........¡¡
शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही....
पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो....
हे जग वेगळेच आहे.....
...
.....
.......
रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात....
मला खुप आवडत त्यांच्याकडे पहायला.
....
....
बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात.......
दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक........
मोठ्यांदा बोलतात.
..
आजोबा काहीतरी विचारतात...
आज्जी वेगळेच ऐकतात....
मग...
काहीतरी बोलतात....
....
ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात....
..
...
....
मला त्यांच्यात शहामृग दिसतो.
मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्व ला नाटक बघायला जाते तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच.
आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो...
आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्ट मध्ये असतात.
आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात......
मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात......
बटाटेवडा खातात...
कॉफी पितात मग परत नाटक पाहायला आत येतात....
नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात.........
....
......
किती रसिक,
म्हातारपण आहे हे....!!
...
एकदा मिलिंद इगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते,
तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधीक शहामृगाच्या जोड्याच होत्या......
....
यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय...!
उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही....
पुण्यातले आजीआजोबा अभीं तो,
'मै जवान हूं' या मानसिकतेतच राहतात नव्हे तसे जगतात...
...
माझं काय आता.... वय झालं.
संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,
my God,,,
इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात.....
...
*वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते - तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल .*
*किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!!*
*छानच नां ........!!!!!!!!*

Sunday 1 April 2018


परवा मित्राकडे असला विजोड साबण बघितला, अन् टचकन डोळ्यात पाणी आले.
एकदम् आई आठवली!
साबण विरत आला, हातात येईनासा झाला की आई नवा साबण काढायची, जुन्या विरलेल्या साबणाचा तुकडा त्याला चिटकवायची.
मला नाही आवडायचे.
'हा काय किडेखाऊपणा?' मी चिडायचो, 'फेकून दे ना तो तुकडा. नव्या साबणाची मजाच जाते!'
आमची घरची आर्थिक परिस्थिती छानच होती, हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची.
पण आई ऐकायची नाही!
'कमवता झालास कि कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!'
मला पटायचे नाही.
शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो!
'हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!' असा इशारा द्यायचो पण काही एक ऊपयोग व्हायचा नाही. वर्षानुवर्षे असाच दुरंगी साबण वापरावा लागला.
वर्षांपुर्वी आई गेली.
जेव्हा होती तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचे मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!
बाथरूममधुन बाहेर आलो, डोळे लाल झाले होते.
मित्राने विचारले,
'काय रे, डोळ्यात साबण गेला का?'
'नाही रें, साबणामागची आई!'

Friday 30 March 2018

*पूर्वीचा काळ बाबा*
*खरंच होता चांगला*
*साधे घरं साधी माणसं*
*कुठे होता बंगला ?*
*घरं जरी पत्र्याचे पण*
*माणसं होती मायाळू*
*साधी राहणी चटणी भाकरी*
*देवभोळी अन श्रद्धाळू*
*सख्खे काय चुलत काय*
*सगळेच आपले वाटायचे*
*सुख असो दुःख असो*
*आपुलकीने भेटायचे*
*पाहुणा दारात दिसला की*
*खूपच आनंद व्हायचा हो*
*हसून खेळून गप्पा मारून*
*शीण निघून जायचा हो*
*श्रीमंती जरी नसली तरी*
*एकट कधी वाटलं नाही*
*खिसे फाटके असले तरीही*
*कोणतंच काम रुकलं नाही*
*उसनं पासनं करायचे पण*
*पोटभर खाऊ घालायचे*
*पैसे आडके नव्हते तरीही*
*मन मोकळं बोलायचे*
*कणकीच्या उपम्या सोबत*
*गुळाचा शिरा हटायचा*
*पत्राळ जरी असली तरी*
*पाट , तांब्या भेटायचा*
*लपणा झपणी धप्पा कुटी*
*बिन पैशाचे खेळ हो*
*कुणीच कुठे busy नव्हते*
*होता वेळच वेळ हो*
*चिरेबंदी वाडे सुद्धा*
*खळखळून हसायचे*
*निवांत गप्पा मारीत माणस*ं
*वसरीवर बसायचे*
*सुख शांती समाधान " ते "*
*आता कुठे दिसते का ?*
*पॉश पॉश घरा मधे*
*" तशी " मैफिल सजते का ?*
*नाते गोते घट्ट होते*
*किंमत होती माणसाला*
*प्रेमामुळे चव होती*
*अंगणातल्या फणसाला*
*तुम्हीच सांगा नात्या मध्ये*
*राहिला आहे का राम ?*
*भावाकडे बहिणीचा हो*
*असतो का मुक्काम ?*
*सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी*
*कुणीच कुणाला बोलत नाही*
*मृदंगाच्या ताला वरती*
*गाव आता का डोलत नाही*
*प्रेम , माया , आपुलकी हे*
*शब्द आम्हाला गावतील का ?*
*बैठकीतल्या सतरंजीवर*
*पुन्हा पाहुणे मावतील का ?*
*तुटक तुसडे वागण्यामुळे*
*मजा आता कमी झाली*
*श्रीकृष्णाच्या महाला मधुनी*
*सुदामाची सुट्टी झाली*
*हॉल किचन बेड मधे*
*प्रदर्शन असतं वस्तूंचं*
*का बरं विसर्जन झालं*
*चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

Thursday 29 March 2018

*अशीच यावी वेळ एकदा*
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना
उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक
मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर
मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा
संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे
तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना
हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला
सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये
शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

Wednesday 28 March 2018

गृहिणीची अचिव्हमेंट
मी घरीच असते.हे अगदी हलक्या आवाजात ती
म्हणाली…
माझं उत्तर, अरे व्वा मस्तच!!
काय मस्तच ग ?लाज वाटते मला,एवढं उच्च शिक्षण घेऊन, मी गृहिणी आहे सांगायची.
हल्ली सगळीकडे हा संवाद ऐकायला मिळतो.
स्वत:ला गृहिणी म्हणून जगायला लाज कशासाठी वाटायला हवी.आपली संस्कृती ,आपले संस्कार,आपले विचार,आचार व्यक्त करण्यासाठी तुम्हाला किती तरी वेळ मिळतो.आता वेळ नाही ही सबब प्रत्येक जण पुढे करते.तस काहीही नाही.स्वत:साठी
वेळ काढणे,त्याचा योग्य तो वापर करून स्वत:ला
व कुटूंबाला आनंदी ठेवणे , तुमच्याच हातात आहे.
तुमच्या कडे गृहिणीपद आहे,यात किती तरी गोष्टींचा आनंद घेऊ शकता.लग्न झाल्यानंतर हळूवारपणे बाळाची चाहूल लागते.त्या क्षणाचा आनंद घेत,त्याच्या गर्भातील हालचालींचा सुखद अनुभव.त्याच्या जन्मानंतर त्या बाळाची रोज होणारी प्रगती, पालथं पडणं,रांगणे, हळूहळू पाऊल टाकणे.आंघोळ
घालताना पाणी बघून त्याच्या डोळ्यात दिसणारा आनंद . हळूवार पावलांचा आवाज,त्याच्या तळव्यांचा स्पर्श.हे क्षण सहजासहजी नाही मिळत.हे उपभोगण्यासाठी तेवढा वेळ ही महत्त्वाचा आहे.
मुलं मोठी.व्हायला लागतात,मग त्यांचे खाणे पिणे, आवडीचे पदार्थ तयार करून खायला घालणे.खुप आवडता पदार्थ आईने केला की शाळेतून आल्यावर
प्रेमाने मारलेली मिठी.आवडती डिश खाताना शाळेत घडलेल्या गमतीजमती.कुणा मित्राची झालेली फजिती,ते सांगतानाच आलेलं खळखळत हसू.खरच सांगा सख्यानो हे सुख दहा तास नोकरी करताना मिळू शकते का ? शाळेच्या रोजच्या दैनंदिनीत इतक्या घटना घडतात की त्यांना घरी आल्याबरोबर ते ऐकायला एक हक्काचा श्रोता हवाच असतो.
या गोष्टी फक्त मुलांच्या बाबतीतच नाही तर,आपला जोडीदार,पती ,त्यालाही तेवढा वेळ देणे,त्याच्या सोबत वेळ घालवणे.संधी मिळेल तेव्हा विविध विषयावर चर्चा करणं हे देखील आनंददायी आहे.गृहिणी आहात म्हणून दुसरं काही करता येत नाही, असे नाही ना! तुम्ही आवडीच्या विषयावर वाचन करणे.चित्रपट बघणे, विणकाम ,भरतकाम, लिखाण करणे.एखाद्या आवडत्या छंदाचे अर्थार्जनात रूपांतर करणे.मुलांच्या वेळेप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी होणे.व्याख्यानम
ाला ऐकायला जाणं.चित्रप्रदर्शन बघणं.स्वत:ला सतत कार्यरत ठेवा.जगातील, देशातील, स्थानिक घडामोडींवर सतत अपडेट राहणं, जेणेकरून मुलांशी, पतीशी,व इतरांशी संवाद साधताना आपले व्यक्तिमत्त्व खुलले पाहिजे.
गृहिणी म्हणून जगाताना मी पैसे कमवू शकत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका.घरी राहिल्याने या सुखद क्षणांचा आस्वाद आपण घेऊ शकतो,हे लक्षात ठेवा.
पैसा कमावणे म्हणजेच जीवन सार्थकी लागते असे नाही ना.आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी करणे हाच नाही,तर तुम्ही उच्चशिक्षित असल्याने तुमच्या कुटुंबाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकता.हे कायम लक्षात ठेवा.हे आनंदाचे क्षण तुमच्या हृदयाच्या तिजोरीत जपून ठेवा,ती तुमच्या आयुष्यभराची साठवण आहे.तेव्हा अभिमानाने सांगा मी गृहिणी आहे......

Tuesday 27 March 2018

भूक....
किती प्रकारची
कधी खपाटीला गेलेलं पोट
तर कधी ताटावर खिळलेली नजर
कधी अगदीच मंद झालेली हालचाल
तर कधी आधाश्यासारखं खाणं......
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत लोचट नजर
पैशांसाठी सदैव हपापलेले हात
अत्यंत निर्लज्ज असं वागणं बोलणं
तर कधी पैशासाठी कुठल्याही थराला जाणं........
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत जिज्ञासू ज्ञानपिपासू वृत्ती
डोळ्यांना लागलेला भिंगाचा चष्मा
पानांवरून झरझर फिरणारी नजर
बोलतानाही बोटं दोन पानात अडकलेली.......
दाखवते भूक . . . . .
.
.
.
.
.
.
कधी पायाला बसलेली घट्ट मिठी
तर्जनी पकडायला धावणारा हात
तर कधी कडेवर बसण्यासाठी पसरलेले हात
डोळ्यांमधे खचाखच भरलेलं आर्जव.......
दाखवते भूक . . . . .

Monday 26 March 2018

जे मनापासुन केले तरी भेटत नाही,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
मनात असुन पण जे व्यक्त करता येत नाही,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
लांब जाऊन पण जे नेहमी आठवत ते ,
बोलताना पण नकळत जे डोळ्यातुन आश्रु आणत .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....
आपल्या सोबत भांडताना,पण ?????
आपल्यावर हक्क सांगते,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
जे मनातुन रडुन पण आपल्याला हसवते,
डोळे बंद केले तरी,मनात दिसते .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....
जे मनापासुन हव असताना कधीचं मिळत नाही,
आणि ज्याना मिळत त्याना ते टिकवता येत नाही .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....!!

Sunday 25 March 2018

माझ्या व्याख्याच वेगळ्या आहेत *'श्रीमंती'* च्या.
.
.
बघा, पटतात का तुम्हाला !
.
.
घरात दररोज ताजी फळं/फुलं/भरपूर दूध/दही असणं म्हणजे... *'श्रीमंती'*.
.
.
.
आज अवचित पाहुणा दारात आला आणि मी त्याला पोटभर जेवू घालू शकले तर,
...मी *'श्रीमंत'* आहे.
.
.
माझी सहज आठवण आली म्हणून एखाद्या मित्रमैत्रिणीचा, नातेवाईकाचा फोन आला तर,
...मी *'श्रीमंत'* आहे.
.
.
कुणीतरी अडचणीत आहे,
मदतीसाठी माझी आठवण आली तर,
...मी नक्कीच *'श्रीमंत'* .
.
.
कुणाचे तरी विश्वासपात्र असणे म्हणजे... *'श्रीमंती'* .
.
.
भर उन्हात फुललेला गुलमोहोर/फुललेली झाडे दिसावी म्हणजे... ...नजरेची *'श्रीमंती'*.
.
.
.
थंडीत मस्त फुले अंगणभर पडावीत तर कधी पारिजातकाचा सडा, सोनचाफ्यांची फुले पडावी आणि त्यांच्या सुगंधानें सबंध अंगण भरून जावं ही *'श्रीमंती'*.
.
.
थंडीच्या गारठ्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुक्यात फुलांचा सुगंध तृप्त, मदमस्त करून जावा,
...हीच *'श्रीमंती'*.
.
.
.
होय. मला अशीच *'श्रीमंती'* हवी आहे.
.
.
.
अशी *'श्रीमंती'* आपल्यालाही लाभावी.
.
.
.
असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यावेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आनंदाने जगता यावेत .
.
.
.
आपल्या आसपास भरपूर माणसं असावीत आणि आपण खरंच या अर्थाने *'श्रीमंत'* व्हावे.
.
.
.
*'श्रीमंती'* म्हणजे समाधान.
...समाधानात *'श्रीमंती'*.

Saturday 24 March 2018

अप्रतिम कविता
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!
Really heart touching. ...

Friday 23 March 2018

अंड्या मध्ये प्लास्टिक...
तांदळामध्ये प्लास्टिक...
बिसलरी मध्ये प्लास्टिक...
खव्या मध्ये भेसळ...
दुधात पाण्याची भेसळ...
भाजी पाल्यात गटाराचे पाणी,
कलिंगड खावे तर कलर चे इंजेक्शन,
डाळिंबाच्या ज्युस मध्ये साकारीन ची भेसळ,
चॉकलेट मध्ये किडे,
चिकन खावे तर इंजेक्शन मारून कोंबडी फुगवलेली,
मच्छी खावी तर ताजी चा पत्ताच नाही,
मटन खावे तर कुत्री कापलेली,
पाणी पुरी खावी तर मुतलेला भय्या हातात लोटा पकडून,
वडा पाव खाल्ला तर वड्या मध्ये झुरळ,
मेकअप करावी तर डुप्लिकेट मटेरियल,
गाडीत डिझल भरावे तर पंप वाले कट मारतात,
पेट्रोल भरावे तर रॉकेल ची भेसळ,
बँकेत पैसे ठेवावे तर कोणतरी घेऊन पळतो,
बँकेतून पैसे काढले तर टॅक्स लागतो,
पैसे जास्त जमा केले तर विचारतात आले कुठून,
जमीन विकली तर बिल्डर पळतो,
स्वतःच्या जमिनीवर घर बांधले तर पालिका तोडते,
प्रेम करावे तर Gf चे घर वाले धुवतात,
लग्न करावे तर नोकरी नाही,
कंटाळा आला म्हणून 10 मिनिटे घरा बाहेर बाईक वर पडलो तर हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये दंड.
प्लॅट फॉर्म वर मित्रा ला सोडायला गेलो तर 500 रुपये दंड.
शाळेत ऍडमिशन ला गेलो तर आधार कार्ड नाही म्हणून प्रवेश बंद.
60 वर्षा वरील म्हाता-या आजोबाला ST चा प्रवास मोफत पण बस स्थानकावर 4 पावले आजोबा मागे उभे राहिले तर ड्रायव्हर बस थांबवत नाही.
मेहनत करून पोलिसात भरती व्हावे तर दिवस भर उन्हात उभे राहा.
RTO मध्ये भरती व्हावे तर धूळ खात मरा.
आयुष्य भर इमानदारीत नोकरी करावी तर PF खाऊन पळतो मालक.
यात्रा पालखी मध्ये थोडा वेळ नाचावे तर बेवड्याला सोडून पकडतात पोलीस.
2 दिवस देवदर्शनाला जावे तर घरदार साफ करतात चोर.
निवडणूक जवळ आल्यावर पाया पडतात नेते, निवडून आल्यावर बघत पण नाही खोटे.
फेरीवाले झालेत गल्लो गल्ली जाम
चालून देत नाही जनतेला सरेआम.
कच-याने झाली सामान्य जनता बेहाल.
15 लाख देण्याचे दिले त्यांनी वचन
सत्ता संपत आली आत्ता भूल जाए वतन...!
सरकार माय बापा जगू तरी कसे?
तुम्हीच सांगा मी तुम्हाला मत देऊ तरी कसे???

Thursday 22 March 2018

गावात रेंज असो वा नसो,
चेंज मात्र नक्की झालाय,
कनेक्टीव्हीटी वाढली पण,
माणुस माणसापासुन दुर गेलाय.....
गावागावात उभे झाले,
राजकारणाचे टाॅवर,
भाऊच भावाला दाखवतो ,
राजकारणाची पाॅवर.......
इथेही झळकतात शुभेच्छांचे,
मोठ्मोठाले बॅनर,
गावच्या समस्या शोधण्याचा,
नाही कुणाकडेच स्कॅनर.....
इथेही दिसतो प्रत्येक,
तरुणाच्या हाती स्मार्ट फोन,
तसाच का दिसु नये ?
उन्नतीचा स्मार्ट दृष्टीकोन.....
वायफाय सारखी कनेक्ट व्हावी,
माणसे इथली सगळी,
गाव एडीट करण्याची,
शक्कल लढवावी आगळी.......
एडीट करून व्हाट्सअप चे डिपी सजवतो ,
तसे एडीट करून सजवावे गाव,
फेसबुक व्हाट्सअप च्या वाॅलवरही मग,
तुमचाच वाढेल भाव......

Wednesday 21 March 2018

जगण्याचा 'अनपेक्षित' मार्ग"
कधी कधी जीवनात आपण विचार करतो एक आणि होते एक " ह्या वाक्क्याचा सर्रास उपयोग आपण करीत असतो फक्त वाक्या समोर उगीचच "कधी कधी "असा शब्द लावतो, प्रत्यय मात्र रोजच येतो. का होत असेल असे याचा कधी आपण विचार करीत नाही किंवा तेवढा वेळ आपल्याजवळ नाही आहे. पण कधी थोडा थांबलात व शांतपणे विचाराधीन झालात तर मग मात्र हि उकल होईल. आपण प्रत्येक जण कोणातरी कडून काहीतरी अपेक्षा करीत असतो. आपली जशी इच्छा आहे तसे घडले पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा बाळगून आपण जगत असतो. आपल्या सभोवती असलेल्या जीव व अजीवाकडून सुद्धा. अगदी बेभान होऊन जसे काही आपण या जगाचे मालक आहोत. ज्याने त्याने आपल्या मनासारखे वागले पाहिजे, आईवडील, बहीण भाऊ, पत्नी मुले, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, ग्राहक , दुकानदार, सरकार, संस्था, इत्यादि इत्यादी. केवढा हा अट्टाहास, त्यांचे गृहीतके काय आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते आणि जेंव्हा या सर्वांकडून तुमच्या अपेक्षेची उपेक्षा होते तेंव्हा मात्र स्वतःच आत्मपरीक्षण न करता नुसता संताप व्यक्त होतो व तोंडातून वाक्य निघते , " अरे यार काय हे जीवन , मी काय विचार केला होता आणि हे काय झाले....!
जीवनात कोणाही कडूनच कोणतीच अपेक्षा ठेऊ नका. कुठलंच गृहीत करू नका, कुणावर कुठलंच बंधन टाकू नका, जेवढं सहज अन नैसर्गिक जगता येईल तेवढं जगा. बिनधास्त टाकून द्या निसर्गावर तुमच्या अपेक्षा. घडू द्या सर्व अनपेक्षित, जे जस होईल तस होऊ द्या. विश्वास ठेवा, पहा त्यातून निर्माण होईल तो आनंदच, समाधानच. उपेक्षा होणारच नाही तर मनस्तापही नाही. कोणतेच बंधन घालू नका मनावर कोणाच्या अपेक्षेचे, इच्छेचे, नात्याचे, जबाबदारीचे , निरंक, निर्मळ, निर्भेळ रहा. आशावादी रहा, सकारात्मक रहा हिच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे, जगण्याचा सोपा आणि " अनपेक्षीत " मार्ग सुद्धा...

Tuesday 20 March 2018


एखादी स्ञी राञी 12 नंतर Online राहत असेल तर ती एवढया राञी online का राहते?........... मोठ्ठा प्रश्न (?) ........
( मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का?...... हिच्या घरामधे काही problem असेल का?...... तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?...... कि हिचं नव-याशी जमतंच नसेल, कि आणखी काही problem असतील..... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असातात)
एखादी स्ञी जर प्रेम कविता लिहित असेल तर ....... Big question?(?) ....
( तिचं कोणावर प्रेम आहे का? ....... तिला कोणी आवडतो का? ....... किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?..... असेल तर लग्ना आधीचा आहे कि लग्नानंतरचा?...... आणि नसेल तर ही अशी लिहिते....वैगरे वैगरे .... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात
एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........ अतिशय मोठा प्रश्न (?)
( ही असे स्वतःचे फोट टाकत का असते?????,.... हिला काय दाखवायचं असतं?...... हिचं हे वय आहे का?..... ही अशी का वागते?...... वैगरे वैगरे असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात )
तर या सर्व प्रश्नाच एकच उत्तर ते म्हणजे, जरी ती एक स्त्री असली तरी ती एक माणूस आहे..... तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे...... तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते ......... आणि तिला ते जमतं देखील ...... तिच्या अश्या वागण्या मागे काही कारण असतचं असं नाही ........ कोणीही एखादी व्यक्ती असो त्याला अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो...... तुम्हांला जर जमत असेल तर तुम्ही पण या गोष्टी करा आणि जमत नसेल तर, उगीचच तिच्यावर "असंस्कारक्षम" असल्याच लेबल लावू नका...... एवढंच...

Monday 19 March 2018

एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"
"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?
बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.
तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?
आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."
पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."
दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.
पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."
भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.
सोऽहं शिवोहं !!
शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना?

Saturday 17 March 2018


ज़िन्दगी की आपाधापी में,
कब निकली उम्र हमारी,
*पता ही नहीं चला।*
कंधे पर चढ़ने वाले बच्चे,
कब कंधे तक आ गए,
*पता ही नहीं चला।*
किराये के घर से
शुरू हुआ सफर,
अपने घर तक आ गया,
*पता ही नहीं चला।*
साइकिल के
पैडल मारते हुए,
हांफते थे उस वक़्त,
अब तो
कारों में घूमने लगे हैं,
*पता ही नहीं चला।*
हरे भरे पेड़ों से
भरे हुए जंगल थे तब,
कब हुए कंक्रीट के,
*पता ही नहीं चला।*
कभी थे जिम्मेदारी
माँ बाप की हम,
कब बच्चों के लिए
हुए जिम्मेदार हम,
*पता ही नहीं चला।*
एक दौर था जब
दिन में भी बेखबर सो जाते थे,
कब रातों की उड़ गई नींद,
*पता ही नहीं चला।*
बनेंगे कब हम माँ बाप
सोचकर कटता नहीं था वक़्त,
कब हमारे बच्चे बच्चों वाले होने योग्य हो गए,
*पता ही नहीं चला।*
जिन काले घने
बालों पर इतराते थे हम,
कब रंगना शुरू कर दिया,
*पता ही नहीं चला।*
होली और दिवाली मिलते थे,
यार, दोस्तों और रिश्तेदारों से,
कब छीन ली प्यार भरी
मोहब्बत आज दे दौर ने,
*पता ही नहीं चला।*
दर दर भटके हैं,
नौकरी की खातिर ,
कब रिटायर होने का समय आ गया
*पता ही नहीं चला।*
बच्चों के लिए
कमाने, बचाने में
इतने मशगूल हुए हम,
कब बच्चे हमसे हुए दूर,
*पता ही नहीं चला।*
भरे पूरे परिवार से
सीना चौड़ा रखते थे हम,
कब परिवार हम दो पर सिमटा,
*।।। पता ही नहीं चला ।।।*

Friday 16 March 2018

सगळे घेतात माझ्या
सुख-दुःखाची दखल
एक तू सोडून...
खरचं इतका दूर
गेलास काय रे
सगळेच धागे तोडून...?
जग जवळ आलंय म्हणे
अन् अनोळखीही झालेत ओळखीचे
तुझा मात्र पत्ताच नाही
अन् तूच सांगायचा...
नातं आपलं शतजन्मीचे
वाढदिवसही वाटतो सूना
सुने झाले सण-समारंभ
तुझ्या शुभेच्छाविना
हरवलाय जगण्यतला आनंद
गेलोय आपण एकमेकांपासून
खूप दूर....
तरीही मन हेलावतं
जेव्हा येतो... तुझ्या आठवणींचा पूर
नसेल तुला चिंता माझी...
नसूदे... तक्रार नाही
मात्र तुझी खुशाली कळव
तुझं-माझं नातं एकदा तरी आठव

Thursday 15 March 2018


बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र आसवा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!

Wednesday 14 March 2018


*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*

*या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*
*मुले म्हणाली ,तलवार...*
*आईने सांगितले.. जीभ..*
*कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो, दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.*
*या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*
*एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*
*आई म्हणाली...भूतकाळ.*
*माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.*
*या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*
*दुसर्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.*
*आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..हाव.*
*लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.*
*पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*
*तिसर्या ने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.*
*आई म्हणाली, सगळ्यात कठिण वस्तू... वचन.*
*वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*
*पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*
*चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.*
*आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*
*पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.*
*पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*
*पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*
*आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.*
*कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*
*शेवटचा प्रश्न..*
*या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*
*मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*
*आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*

Tuesday 13 March 2018


खरचं का रे तुला …….?
खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ? की माझ्या मनापर्यंत पोहचण्याइतका वेळचं तुला मिळत नाही ?
सकाळी उठताच तुझ्या हाती वृत्तपत्र असतं, मला मात्र किचन मधलं कामचं आधी दिसतं
हातात टीव्हीचा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो
मला मात्र सगळं आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो
सकाळच्या या गडबडीत कधीकधी मला कपभर चहाही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
संध्याकाळी तू ऑफिस मधून दमून घरी येतोस, मलाही तुझ्या सारखच दिवसभर काम असत हे मात्र तू अगदी साफ विसरतोस.
रात्रीचा स्वयंपाक, सकाळची तयारी माझी नुसती धावपळ सुरु असते, स्वतःबद्दलही विचार करायला ही मला फुरसत कुठे असते ?
तक्रार नाही रे, पण सगळ मँनेज करताना मला पुरेशी झोपही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
सुट्टीचा दिवस म्हणजे तुझ्या हक्काच्या विश्रांतीचा दिवस
असतो, मला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो.
त्यातचं पाहुणे, मित्र यांच येणं , तुझ्यासाठी गेट-टुगेदरची मजा असते, माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही ओवर टाईमची सजा असते
मला कधीच का हक्काची सुट्टी किंवा एखादी रजाही मिळत नाही खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
तू खूप काही मदत करावीस इतकी माझी अपेक्षाच नसते वाईट फक्त वाटतं जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते
मला वाटतं निदान तुला माझ्या कामाची , ते करण्यामागच्या
प्रेमाची जाणीव असावी, थोडी का होईना तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसावी
समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्यानीच मला आनंद मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
की माझ्या मनापर्यंत पोहचण्या इतका वेळच तुला मिळत नाही .....!
-एका पत्नीचं मन

Monday 12 March 2018


*"ए आई" आणि " अहो आई " विषयीची एक छान कविता...*
माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रूजत नाही
तोवर तुलना होणारच दोघीमध्ये
ए आई आणि अहो आई।।
आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते
पण कर्तव्यदक्ष सुगृहीणी घडवण्यासाठी अहो आई कठोर वागते।।
जन्मदात्या आईची सर कोणालाही येणार नाही
पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही।।
ताणल्याशिवाय तुटत नाही
अन् टाळी एका हातानं वाजत नाही
असं एकतरी घर दाखवा बघू
जिथं भांड्याला भांड लागत नाही।।
अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान
म्हणजे घराच्या रंगमंचावर
होणारच नाही नाटक मानापमान।।
अहो आईचा मोठाच पाठींबा
घरादाराला त्याचाच आधार
मुलं तिच्याच स्वाधिन करून
आपण संभाळतो घरसंसार।।
माहेरची जाईजुई बहरून
सासरच्या मंडपावर चढते
ए आई इतकं मुलीचं कौतूक
अहो आई सुनेचंही करते।।
सर्व आया आणि सासवांनां समर्पित.....

Sunday 11 March 2018

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली .प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही .
सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले ,'आपला आजचा तास इथेच संपतो आहे पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो .
किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले .
" काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती .वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं .पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली .रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक सुंदर ललना उभी होती . मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का ? हो , मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल . गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली .वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन .
तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे . मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली .एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं . निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली .अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल ....
'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो .'
प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला .
प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले ," माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे ."
***** , निघ बाहेर वर्गाच्या ...

Saturday 10 March 2018


*महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची रंजक कहाणी*
_तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. खेड्यापाड्यात आजही लोक एसटी वाट पाहात थांबलेली दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना आधार आहे फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला किंवा तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला
*१ जून १९४८ रोजी पहिल्यांदा धावली एसटी*
महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. पहिली एसटी बस म्हणजे तिचा थाट विचारायला हवा का? किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.
 *कशी होती पहिली एसटी बस?*
जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉ़डी आजच्यासारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं. लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसनक्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसचं तिकीट होतं अडीच रुपये.
*ठिकठिकाणी झाले जल्लोषात स्वागत*
अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसनक्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं.  गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावांमध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई.
*पोलीस बंदोबस्तात धावली पहिली एसटी बस*
पुण्यामध्ये शिवाजीनगरजवळच्या कॉर्पोरेशनपाशी या बसचा शेवटचा थांबा होता, मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्याने या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली.
_येत्या 1 जून रोजी या घटनेला 70 वर्षे होतील. आजही त्याच निश्चयाने एसटी लोकांना गावोगावी पोहोचवण्याचं काम करत आहे._

Friday 9 March 2018

*ब्रेक्स*
     एका आवडलेल्या इंग्रजी व्हॉटस अप मेसेजचे स्वैर भाषांतर -

 एकदा फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला.
" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "

त्यावर निरनिराळी उत्तरे आली
" थांबण्यासाठी "
" वेग कमी करण्यासाठी "
" अपघात टाळण्यासाठी "

परंतू सर्वात चांगले उत्तर होते
" जास्त वेगाने जाता येण्यासाठी "
असे कसे ? जरा विचार करा.

जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल?
कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.

      जिवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात.
परंतू लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जिवनात अधूनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.

Thursday 8 March 2018

*१. गगनभरारीचं वेड*
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*२. झुंज*
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*३. कॅलेंडर*
भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.
*४. संघर्ष कुठपर्यंत?*
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
*५. पडावं तर असं!*
आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.
*६. परिपूर्णता?*
जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
*७. नको असलेला भाग*
दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
*८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ*
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
*९. समस्या*
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
*१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?*
प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
*११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान*
समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.
*१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'*
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.
*१३. पळू नका*
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.
*१४. पाठीची खाज*
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..
*१५. माफी*

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.
*१५. खर्च-हिशोब*
खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.
*१६. गैरसमज*
गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.
*१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान*
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
*१८. अपेक्षा-ऐपत*
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.
*१९. अपयशाची भीती*
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.
*२०. खरी शोकांकिका:*
बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.
*२१. कौतुकाची खुमारी*
कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.
*२२. झरा आणि डबकं*
वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
*२२. कागद-सर्टिफिकेट*
सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.
*२३. रातकिड्याचा आवाज*
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.
*२४.फुगा किती फुगवायचा?*
एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.
*२५ हरवण्यासारखं घडवा*
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

Wednesday 7 March 2018

🌹   *चार   किंमती  रत्ने*
          पाठवित  आहे    🌹
( पूर्ण  'विश्वास'  आहे  मला   की,  तुम्ही  ह्याने  नक्कीच  'श्रीमंती'   मिळवाल.  )
    💥   पहिले   रत्न    💥
           💫  *माफी*  💫
    तुमच्याबद्दल   कोणी  काहीही  बोलले तरी  ते
 मनाला  लावून  न  घेता,  'माफ'  करा.
        💥 दुसरे  रत्न  💥
           💫  *विसरा*  💫
       दुसर्यांवर  केलेले  उपकार  विसरा.  फळाची  अपेक्षा  करु  नका.   'निःस्वार्थ'  भावना  ठेवा.
       💥  तिसरे  रत्न 💥
          💫  *विश्वास*  💫
        नेहमी  'स्वकष्ट'  आणि  'ईश्वरावर'  अतूट  विश्वास  ठेवा.    हीच  तुमच्या  यशाची  पावती  असेल.
      💥  चौथे  रत्न   💥
         💫   *वैराग्य*  💫
        नेहमी  लक्षात  ठेवा  की,  'जन्म'  आणि  'मरण'  कधीच  कुणालाच  चुकलेले  नाही.  'जन्म'  घेतला  म्हणजे  'मृत्यु'  अटळ  आहे.  वर्तमानात  जगा.   कोणत्याही  गोष्टींचे  दुःख  कुरवाळित  बसू  नका.  'जीवन'  खूप  सुंदर  आहे.
             *🙏🙏*

Tuesday 6 March 2018

*'सर' शब्दाची लाज वाटते*
काय सर? काय चाललंय? या साध्या प्रश्नाला समोरून उत्तर आलं. सर, तेवढं म्‍हणू नका ओ, शिवी दिल्यागत वाटतंय. एवढी सर या शब्दाची चीढ बघून थोडंसं विशेष वाटलं.  पण, एका तासिका तत्त्‍वावर प्राध्यापकी (हमाली) करणार्‍या प्राध्यापकाची व्यथा ऐकून या 'सर' शद्बाबद्दल त्यांच्या मनात एवढा राग का? याचे उत्तर मिळाले.
घरची परिस्‍थिती बेताची असताना, स्‍वत:च्या कष्‍टावर उच्‍च शिक्षणापर्यंत मजल मारली. कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी लागणार्‍या सर्व पदव्या मिळवल्या. पण, आजपर्यंतही सन्‍मानाने 'सर' म्‍हणवून घ्यायची लाज वाटते. अशा शब्दात एक उच्‍च विद्याविभूषित तरूण बोलत होता.
पाचवीपासून ते एमएच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारने जे कॉलिफिकेशन ठरवून दिले. ते सर्व पूर्ण केलं. बीए केलं. बीएड केलं. एमए, सेट, नेट, पीएच.डी सुद्धा केली.  प्राध्यापक नाही तर, शिपायाची तरी नोकरी मिळेल अशी आशा घेऊन वाटच बघत राहिलो. सन्‍मानाने जगण्यासाठी कोणते कॉलिफिकेशन आहे. तेच समजत नाही, असे तो म्‍हणाला.
गावातील शाळेत दहावी पर्यंतचं शिक्षण केलं. उच्‍च माध्यमिक आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षणही कमवा व शिका योजनेतून केलं. तेव्‍हाच कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न पाहिलं होतं. त्यानुसार सीईटी देऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये बीएडसाठी प्रवेश मिळवला. चांगल्या गुणांनी बीएड उत्तीर्ण झालो. त्याच काळात राज्य सरकारनं शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केली. पुन्‍हा आशावादी झालो. आता ही परीक्षा पास झालो की मिळेल नोकरी या भाबड्या आशेनं. 'टीईटी'ही पहिल्याच प्रयत्‍नात पास झालो. त्यानंतर सरकार शांत झालं. माझ्या आशावादी जीवनाचा पुढचा प्रवास सुरूच होता.
एमए, बीएड झालो तरी नोकरी नाही. टीईटीचाही उपयोग नाही. म्‍हणून शेतात कामाला जाण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्याची इच्‍छा स्‍वस्‍थ बसू देत नव्‍हती. पुन्‍हा सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा 'सेट' व 'नेट'ची तयारी सुरू केली. दरम्यान, पीएच. डीला प्रवेश घेऊन डॉक्‍टर होण्याचंही स्‍वप्‍न पाहिलं. केवळ शिक्षण जगवू शकत नाही, त्यामुळे नोकरी शोधतच होतो, असा प्रवास तो सांगत होता.
एका खासगी महाविद्यालयात तासिका तत्त्‍वावर रूजू झालो. दरम्यान, राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी पुन्‍हा अभियोग्यता चाचणी घेण्याचे ठरवलं. एवढं सगळं झाल्यावर ती परीक्षाही दिली. त्याचंही असंच झालं. पुढं काय झालं समजलंच नाही. सध्या मानधन मिळतंय ७ हजार रुपये. तेही  त्या त्या महिन्याला नाही. निम्‍मी रक्‍कम महिन्याला मिळते आणि उर्वरित वर्षाच्या शेवटी. तर मग तुम्‍हीच सांगा. ३ ते ४ हजार रुपयांत आयुष्याची २७-२८ वर्षे शिक्षणात घालवलेल्या तरुणाने करायचे काय? आणि जगायचं कसं? त्याचा हा प्रश्न विचारात पाडणारा होता.
प्राध्यापक म्‍हणून राहायचं म्‍हटलं तरी पदरमोड करावी लागते. एवढं शिकूनही घरी पैसे मागून राहावं लागतं. कधी कधी जगण्याचीही लाज वाटते. गावी गेलं तरी लोक विचारतात. काय कराताय सर? झालं का नाही शिक्षण? अजून किती राहिलंय शिकायचं? मग याच 'सर' शब्‍दाची लाज वाटते. एवढंच नाहीतर कुणी सर म्‍हटलं तर तो सन्‍मान नाही तर शिवी वाटते, असे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी आले.
शिक्षण व्यवस्‍थेचे आणि शिक्षणाचे वास्‍तव सांगत होता, एक उच्‍च विद्याविभूषित तरुण. शिक्षक होण्यासाठी झगडणारा आणि शिक्षक होण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. कदाचित थोड्याफार फरकाने असेच आशादायी तरुण राज्यात अनेक आहेत. शिक्षक होण्यासाठी पैसे भरण्याची ऐपत नसलेले.

Monday 5 March 2018

आयुष्यात प्रेम केल होत,
कुणालातरी आपल आयुष्यच
देऊ केल होत...
म्हणतात, प्रेम करण सोप
असत ते व्यक्त करण कठीण
असत, प्रेम पहाण सोप
असत, ते समजून घेण कठीण
असत...
आणि हेच समजून घ्यायच
होत, म्हणून, आयुष्यात प्रेम
केल होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत...
असतो का प्रेमात खरच
आनंद का नुसतच "I Love U"
म्हणायच असत?
विरहात त्याच्या बुडून
मरायच असत की फक्त
"I Miss U" म्हणायच असत?
हेच बघायच होत म्हणूनच
आयुष्यात प्रेम केल होत,
कुणालातरी आपल आयुष्यच
देऊ केल होत...
म्हणुनच तिच्याजवळ
व्यक्त करण ठरवल,
आणि व्यक्तही केल होत
पण...
त्याला "माझ तुझ्यावर
प्रेम नाही" असं
म्हणायला काहीच वाटल
नव्हत, असतात खरच
अशी माणस या जगात हे
कधी मी पाहील नव्हत...
झगडत होते त्याच्याकडून ते
"I Love You" हे तीन शब्द
ऐकण्यासाठीकधी,
त्याच्या आठवणीत मरत होते,
तर कधी मरुनच जगत होते...
आणि कदाचित हेच
माझ्या मनाला अनुभवयाच
होत...
म्हणूनच आयुष्यात प्रेम केल
होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत...

Sunday 4 March 2018

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्‍याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’ बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो... अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो... त्यावर माणसे ठाम असतात...  खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते... विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे... म्हणजे मग तो विकसित होतो... जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात... ‘माणूस’ समजणे सोपे जाते...
दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही... एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे... अर्थात चुकीचे दृष्टिकोन....
म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’ असे म्हणतात…
________✍​

Saturday 3 March 2018

एकदा कुत्र्यात अन गाढवात
 पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
 तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .
शर्यत सुरु झाली
कुत्रा जोरात धाऊ लागला.
 पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,
असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
तर बघतो
तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते
तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून
निराश झालेला कुत्रा बोलला कि
जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते
             *तात्पर्य काय*
१.आपल्याना विश्वासात घ्या
२.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन  द्या
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा
           आपली_माणसं_मोठी_करा.     👍👍👆​​​👆​​​

Friday 2 March 2018


नवरा बायको एकत्र बसून नॅशनल जिओग्राफि चॅनल पाहात होते........
बायको -  मला भिती वाटतेय, आता तो चित्ता बिचाऱ्या हरणाला पकडून  बहुतेक मारून खाणार ?
नवरा  -  अग हा तर निसर्गनियम आहे.
"जिवो जीवस्य जीवनम्।"
बायको -  please,  काहीतरी करा ना ,,,,.
नवरा - अग मि काय करू शकतो???
बायको -  हे पहा,,,, आत्ताच सांगते,,,,  जर का त्या चित्याने हरणाला मारून खाल्ले तर,,, तर,,,, तुम्हाला मला रोज शॉपिंगला न्याव लागेल,,,,,
दररोज कॅंडल लाईट डिनर द्यावा लागेल,,,,,, आणि ,,,आणि,,,, माझी आई अगदी कायमची आपल्याकडे राहायला येईल ,,,,,,,,,,,,,
.............आता तुम्ही या पुढची स्टोरी या व्हिडीओ मध्ये पहा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Thursday 1 March 2018

*कष्टाची भाकरी गोड लागली...*
*लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...*
*चेहरा आरशासारखा स्वच्छ होता,*
*मुखवटा लावणे जमलेच नाही...*
*जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,*
*कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...*
*जीवन साधे सरळ आहे...*
*भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही...*
*प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली*
*आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...*

Wednesday 28 February 2018


स्त्री आणि पर्स
हा लेख
महिलावर्गासाठी खास
स्त्री च्या आयुष्यात "पर्स" म्हणजे
एक अविभाज्य घटक आहे!
कुठेही जायचे तर "पर्स" हवीच!!
.
.
काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच!!
.
.
ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात ----
.
# सखी
.
.
स्त्रीची एक जिवाभावाची सखीे...
.
तिच्या शिवाय ती अजिबात राहू शकत नाही,
जिथे ती तिथे पर्स आणि
ही सखी म्हणजे तिची पर्स
.
इतर सगळ्या बायकांच्या सारखं
तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे....
नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि
हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .
.
मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर ,
मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार
.
गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार*
.
.
*अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा
तर कंगवा न चुकता हातात येणार.....
.
सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार....
.
.
या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते
आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते
.
पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही....
आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच......
.
.
त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,
सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..
पर्स मधे ठेवलेल्या वस्तू 'तुझ्या गळा,माझ्या गळा" गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात*
आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना
स्त्रीचा जीव निघतो.
.
.
महत्वाच्या वस्तू,कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते,पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही,ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात,आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.
.
.
*एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री,पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच,म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते,नेमकं कुठं तरी वाट बघत बसायची वेळ येते.*
.
.
नेहमी लागणारी औषध,वेलदोडा,चणेफुटाणे,चॉकलेट्स,पेन्सिल,
लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,
लिपस्टिक,पावडर कॉम्पेक्त,घरच्या किल्या,
अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्स मध्ये ..
.
.
त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही(जिच्यात मी नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो),
.
.
अनेक लोकांची कार्डस(जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.
.
.
तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र
फार गॅरेंटी नसते.
.
.
पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक
अविभाज्य भाग आहे हे नक्की...
तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही,
कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.
.
.
*जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्या साठी एक दिव्य असते,"जा मुली जा"अशी भावूक अवस्था असते तिची..*
.
.
नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्स ला नाव ठेवता ठेवता तिच्या वर अवलंबून राहायला सुरु होणे
*या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते*
.
.
अशीच स्त्रीची व पर्स यांची जोडगोळी भटकत राहते, मजा करत, मजा लुटत.

Tuesday 27 February 2018


✍💐✍
*लुगड्याची गोष्ट .*
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बरं बोलली?..........तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते,त्यांची भेट घेतली.आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या... कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!*
♥♥♥♥♥♥♥♥हृदयस्पर्शी वाचणिय अर्थपुर्ण पोस्ट 🙏​

Monday 26 February 2018

💐✍💐
*एक प्रयोग*
रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत....
याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.
काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.
    *तुम्ही पण हा प्रयोग करून बघाच्. जसं आपण कधी बंद असलेल्या मंदिरा समोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो.. मग तसंच् या प्रयोगावर पण विश्वास करून बघा नं.. अट फक्त एकच् आहे बरका.. की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे.. मग कराल नं आज असं..!!*

Sunday 25 February 2018

सुंदर बोधकथा आहे,
 आवडल्यास
इतरांनाही सांगावी अशी .....
एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन
पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"
वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू
लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.
वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.
त्यानंतर वडील कावळ्याने
मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात
घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."
वडील कावळा म्हणाला, "थांब,
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."
मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने
तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.
मग तो झाडावर येवून बसला.
वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"
थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.
फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.
आमच्या धर्माचा अपमान
झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात
होते.
खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे
होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..
गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.
आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.
कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."
इतके बोलून दोघे बाप-लेक कावळे मांस खाण्यासाठी उडून गेले.

Saturday 24 February 2018

काही हरवलेले नंबर्स
********************
होतं असंही कधी कधी
असतात अशा व्यक्ती काही
ज्या आता फक्त
फोनवरच उरलेल्या असतात
सगळ्या नंबर्सच्या लिस्टमध्ये
आपला रकाना पकडून बसतात.
कधीतरी मेसेज केला जाईल
 ह्या प्रतीक्षेत...
पण खूपदा कसलीच हालचाल नसते
कित्येक दिवसात विचारपूस नसते
बोलणं होत महाग.. आणि
मेसेजशीही कट्टी असते
कधीतरी डीपी बघितला जातो
कधी स्टेटस वाचलं जातं
काही क्षणांसाठी मग
मनातल कवाड उघडलं जातं
घडत तसं काहीच नाही ते...
मिटलही जातं .. पुढच्याच क्षणात
कितीतरी खिडक्या
उघडलेल्या असतात ...ह्या
चॅट नामक  ... गदारोळात
 मग होतात काही स्थित्यंतरं
वाढत जातात अंतरं
न पडलेल्या प्रश्नांना
आपसूक मिळणारी उत्तरं
 फोनच्या लिस्टमधून गायब होतात
नांबर्सची उरली सुरली लक्तरं
आणि तरीही थांग न लागावा
 इतकी अदृश्य अंतरं....
कधीतरी मात्र सूर लागतो
जुना राग आळवावा वाटतो
संवादाचा मिटला पंखा अलवारसा
उलगडावा वाटतो
बोटांनी चाळा करूनही
तो नंबर ...दिसत नसतो
व्यक्ती मनात स्पष्ट तरी
नंबर  बाकी ....रकान्यात नसतो...
हातात थिजून राहिलेला फोन
दमलेली बोटं अन उद्विग्न मन
माणसांना जोडणारा...
दूर करू शकणारा...
माणसाहुनही...
ताकदवान ....फोन
दोष तसा फोनचा नाही,
 अन दोष अंतराचा नाही
दृश्य संबंध जोडू पाहणाऱ्या
अदृश्य अशा तारांचा नाही
काही  जागा...रिकाम्या...
रिकाम्याच राहणार असतात
काही फोननंबर्स...
फक्त ..हरवण्यासाठीच असतात
फक्त ..हरवण्यासाठी !!...
...............
....

Friday 23 February 2018


जायचं का परत खेड्याकडे?

दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.
           पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही विशेष नव्हतंच. आणि तरीही फी मात्र डोळे पांढरे करणारी. यात्रेला, लग्नाला, सणाला गावाला येणं जवळपास बंदच झालं होतं. कारण?? एक असेल तर सांगावं.
           दुसरीला नाईलाजास्तव शेतकऱ्याला दिलेली. जेमतेम 3 एकर जमीन. पण मागच्याच महिन्यात पोरानं विक्रमी उत्पादनासाठी कृषी पुरस्कार पटकावला. रोज ची 4 माणसं हाताखाली असतात. शेजाऱ्याची 3 एकर जमीन करायला घेतलेली. काम पडतं थोडाफार पण झोप लागते शांत. पोरं तालुक्याच्या चांगल्या शाळेत जातात. शेत चांगलं पिकतं तरी खूप जास्त पैसे मिळतात असं काही नसलं तरी खर्च भागून उरतातच. भविष्याची पुंजी. कष्ट आहेत पण दगदग नाही. ज्या पोटासाठी मरमर करायची त्यात वेळच्या वेळी तुकडा जातो हे महत्वाचं. सगळे सण, सगळे कार्यक्रम अगदी भपकेबाज नाही पण नटून मिरवते ती पण. कसं जगल्यासारखं वाटतं.
          कशासाठी होता शहराचा अट्टाहास? जास्त पैसे, सुख, शांती, समाधान, काम नको जास्त, मुलांचं शिक्षण, पुढच्या पिढ्यांचं कल्याण. जास्त पैसे मिळतात पण मग उरतात किती? सुख-शांती-समाधान म्हणजे काय हे कळण्याइतका तरी असतो का वेळ? 4 तास रेल्वे मध्ये लोंबकळत थांबणं तेही ज्यात श्वास घेऊन घाम यावा इतक्या गर्दीत. असा कितीसा फरक पडतो आजकाल गावच्या आणि शहरातल्या शिक्षणात. पिढी घडतेय तिथे कि बिघडतेय हा मुद्दा उरतोच.
          थांबा थांबा. याचा अर्थ शहरात जायलाच नको गावातच बरंय. शहरातच प्रॉब्लेम आहेत गावात नाहीत असं नव्हे. म्हणायचं इतकंच आहे की तुच्छतेने बघावं इतकं वाईट आहे का गावात राहणं? गावी राहणं म्हणजे काय मागासलेपण आहे का? सुख समाधान नाहीच का तिथे? शहरात 10बाय 10 च्या खोलीत राहणारांनी गावाला आल्यावर गावाकडचे येडे आणि आपणच शहाणे असा समज का करून घ्यावा? जेमतेम 10 वि झालेल्या मुलीच्या बापानेपण नाक मुरडावे एवढ वाईट काय आहे शेतकऱ्यांत? "जय जवान जय किसान" चा "नको जवान नको किसान" का झाला?
            जास्त अपेक्षा, मोठी स्वप्न असण्यात गैर काहीच नाही. पण कधीकधी आपल्याला नक्की काय हवय आणि नक्की आपण कशाच्या मागे पळतोय याची सांगडंच बसत नाही. उदाहरणार्थ, हवं असतं आयुष्यात स्थैर्य आणि समज असा की जास्त पैसे असलं की ते येतं. आणि मारतो उड्या बिचारा या कंपनीतून त्या कंपनीत. मुलांना "चांगलं" शिक्षण हवं असतं म्हणून मग इंग्लिश माध्यम, वरून सकाळ संध्याकाळ क्लास.... ते बिचारं पोर विचार करायचं, स्वतः शिकायचं विसरूनच जातं आणि मग पुढे 12 वी ला 85% घेणारा पदवीला 40 वर येतो. मुलीला त्रास होईल म्हणून मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब नको असतं. पण मग कितीही आजारी पडलं तरी पाणी देणारं पण कोणी घरात नसतं. सगळी कामे एकटीलाच पहावी लागतात. आणि यात जास्त त्रास होतो पण हा त्रास बोलताही येत नाही कारण स्वतःच्या हाताने तो ओढवून घेतलेला असतो.
          याचबरोबर शहरात स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य आणि हक्क आहेत असा एक समज जनमानसात प्रचलित आहे. परंतु work force participation हे ग्रामीण भागात जास्त आहे असेच आकडेवारी दाखवते. स्त्रियांचे Political participation देखील ग्रामीण भागातच जास्त दिसते. ग्रामीण स्त्रिया स्वतः प्रत्यक्ष काम करून आर्थिक हातभार लावत असल्याने आर्थिक स्वायत्तता देखील त्यांना जास्त आहे. काही प्रमाणात या गोष्टी qualitatively शहरी भागात जास्त असतील पण quantitatively ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक resourcefulness जास्त आहे हे मान्य करावे लागेल. रायगड जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सरपंच महिलेने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत जमीन अधिग्रहनाबाबत केलेली bargaining पाहिली आणि ग्रामीण भागात भरीव महिला सबलीकरण होतंय यावरचा विश्वास आणखी दृढ झाला.
          वरील उदाहरणावरून दिसून येतंय की मृगजळाला भुलून लोकं शहराकडे पळतायत आणि मग झालेला अपेक्षाभंग दाखवता देखील येत नाही. आणि खरं तर थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर ते सगळं गावात देखील कमीजास्त प्रमाणात साध्य होऊ शकतं. त्यासाठी नक्की काय हवंय आणि जे करतोय त्यातून नक्की तेच मिळतंय का हे पहावं लागणार आहे.
          शहरात झगमगाट आहे आणि प्रदूषण पण.  शहरात सुविधा आणि तणाव पण. शहरात पैसे जास्त मिळतात आणि तितकेच खर्च पण होतात. शहरात वस्तू हव्या त्या मिळतात पण माणसं तूटतात.
           शहरांना पर्याय नाही हेही मान्य पण याचा अर्थ गावात राम नाही असा होत नाही. जे गावात मिळत नाही त्यासाठी नक्की शहराकडे वळा पण जे फक्त मिळतंय असं वाटतं पण प्रत्यक्ष मिळत नाही त्यासाठी मात्र अट्टाहास नको. सगळ्यांना शहरात जाणं शक्य नाही. आणि हळू हळू सगळ्या सुविधा गावापर्यंत पोचल्या आहेत. आता गरज आहे ती ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. शेतीला जोडधंद्यांची जोड, अन्नप्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागात विस्तार, MIDC, आधुनिक शेती यामध्ये रोजगारास बराच वाव निर्माण होऊ शकतो.
          शहरातील STANDARD OF LIVING च्या जवळपास 70% ग्रामीण STANDARD OF LIVING पण झाले आहे. आता गरज आहे ती या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची. यात मुलींचा आणि त्यांच्या आई वडिलांचा रोल महत्वाचा आहे. शहरातला नवरा असावा अशी अपेक्षा असावी, अट्टाहास नको. PEAK HOURS ला रेल्वे मध्ये लोम्बकळणाऱ्या आणि ट्राफिक मध्ये 2-2 तास गाडी कमी चालवणाऱ्या व ब्रेक जास्त मारणाऱ्यांपेक्षा ठिबक करून शेत पिकावणारा जास्त QUALITY LIFE जगतो हे कुठेतरी मान्य करावं लागेल.
          यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना त्यांचा जुना social status मिळवून दिला पाहिजे. "शेती उत्तम" हे जुन्या काळात का प्रचलित झाले याकडेही थोडे लक्ष वेधावे लागेल. सुख, समाधान, यश या गोष्टींचे नव्याने अर्थ लावावे लागतील. जगण्याकडे आणि एकूणच सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. Materialism(भौतिकवाद) आणि spiritualism(अध्यात्मवाद) यांचा मेळ घालता आला पाहिजे.
       त्याचबरोबर गावांना शहाराप्रमाणे लोकांना स्वप्न दाखवता आलं पाहिजे. ग्रामीण भागात आज काही प्रमाणात स्वप्नांचे पंख छाटायचं काम होतं त्यात बदल झाला पाहिजे. ग्रामीण भागाने स्वतःची अशी एक "चांगल्या जीवनाची" व्याख्या करायला हवी. आणि मग थोडंस नवीन पद्धतीने तिचं marketing करायला हवं. तरच ग्रामीण जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी आकर्षक ठरेल.
        एवढं केलं तरी आपल्या, भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
        सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं मुळीच नाही. पण काही गोष्टींवर विचार करायची वेळ आलीय हे नक्की.

Thursday 22 February 2018


आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी शंभरची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली‍,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....  gm

Wednesday 21 February 2018


*गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,*
*माणसं तडतड करत आहेत.*
*काय झालंय कळत नाही,*
*फारच चीडचीड करत आहेत.*
*नातेवाईक असो, मित्र असो,*
*भयंकर स्पर्धा वाढलीय.*
*तेंव्हापासूनच माणसाची,*
*मानसिक अवस्था बिघडलीय.*
*कुणी कुणाला काहीच विचारीना,*
*मनानचं कसंही वागायलेत.*
*आजूबाजूच्या लोकांकडून,*
*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*
*कमाई किती, खर्च किती,*
*काहीच कुठे मेळ नाही.*
*भेटायला जाणं, गप्पा मारणं,*
*आता कुणालाच वेळ नाही.*
*कॅपॅसिटी नसतांनाही,*
*खरेदी उगीच करायलेत.*
*Salary व्हायलीय कमी,*
*अन हप्तेच जास्त भरायलेत.*
*शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,*
*की हा घेतो फोर व्हीलर.*
*दूध बॅग आणायला सांगितली की,*
*मोजीत बसतो चिल्लर.*
*अरे, अंगापेक्षा बोंगा,*
*कशाला वाढवून बसतो.*
*पगार जरी झाली तरी,*
*उदास भकास दिसतो.*
*पर्सनल लोन, Gold लोन,*
*जे भेटेल, ते घ्यायलेत,*
*दिलेले पैसे मागितले तरी,*
*गचांडीलाच धरायलेत.*
*सहनशीलता आणि संयम,*
*कुठे चाललाय कळत नाही,*
*पॅकेज भरपूर मिळायलंय,*
*पण, समाधान काही मिळत नाही.*
*घरी काय दारी काय,*
*नुसत्या किरकीरी वाढल्यात.*
*नवऱ्याला न सांगताच,*
*बायकांनी भिश्या काढल्यात.*
*कितीही साड्या, कितीही पर्स,*
*शर्ट, पँटीला गणतीच नाही.*
*तरीही कुरकुर चालूच असती,*
*धड साडी तर कोणतीच नाही.*
*मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,*
*तुला अक्कल नाही.*
*बायकोनं म्हणावं,*
*तुम्हालाच काही कळत नाही.*
*दोनदोन दिवस अबोला,*
*कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.*
*लग्न झालं की पोरं पोरी,*
*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*
*पत्नी पीडित नवऱ्याच्याही,*
*संघटना निघत आहेत.*
*डोळे मोठे करून पोट्टे,*
*बापाकडेच बघत आहेत.*
*दिवेलागण, शुंभकरोती,*
*'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,*
*शक्य असेल याच्यामुळेच,*
*माणसां माणसात वितुष्ट आलं.*
*चित्त थोडं शांत ठेऊन,*
*जुनी पाने चाळावी लागतील.*
*यदाकदाचित पुन्हा माणसं,*
*एकमेकाशी प्रेमाने वागतील.*

Tuesday 20 February 2018


खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोण लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
*सारी असतात आपलीच माणसं !*

Monday 19 February 2018

रावण बनना भी कहां आसान...
रावण में अहंकार था, तो पश्चाताप भी था
रावण में वासना थी, तो संयम भी था
रावण में सीता के अपहरण की ताकत थी,
तो बिना सहमति पराए स्त्री को स्पर्श न करने का संकल्प भी था
सीता जीवित मिली ये राम की ताकत थी,
पर पवित्र मिली ये रावण की मर्यादा थी
राम,
तुम्हारे युग का रावण अच्छा था..
दस के दस चेहरे, सब "बाहर" रखता था..
महसूस किया है कभी उस जलते हुए रावण का दुःख
जो सामने खड़ी भीड़ से बार बार पूछ रहा था.....
"तुम में से कोई राम है क्या?"😊

Sunday 18 February 2018

👉हिंदी फ़िल्मी गीत जे आजारांचे वर्णन करतात
👈
😇😇😇😇😇😇😇😇😇
गीत - 💥जिया जले, जान जले, रात भर धुआं चले
💥
*आजार - 👉ताप*
➖➖➖➖➖➖➖➖➖
गीत - 💥तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही
💥
*आजार- 👉हार्ट अटैक*
💔💔💔💔💔💔💔💔💔
गीत - 💥बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर म बड़ी आग है
💥
*आजार - 👉एसिडिटी*
😶😶😶😶😶😶😶😶😶
गीत -💥 तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ
💥

*आजार-👉 मोतिबिंदु*
👀👀👀👀👀👀👀👀👀
गीत - 💥तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना
💥

*आजार-👉 स्मृतिभ्रंश*
💥💥💥💥💥💥💥💥💥
गीत - 💥मन डोले मेरा तन डोले
💥
*आजार- 👉चक्कर येणे*
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
गीत -💥 टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
💥
*आजार -  मुतखडा
🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕
गीत - 💥जिया धड़क-धड़क जाये
💥
*आजार - 👉उच्च रक्तदाब*
😴😴😴😴😴😴😴😴😴
गीत -💥 हाय रे हाय नींद नहीं आये
💥
*आजार -👉 निद्रानाश*
💂💂💂💂💂💂💂💂💂
गीत -💥 बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता
💥
*आजार-👉 मुळव्याध*
😁😁😁😁😁😁😁😁😁
गीत - 💥लगी आज सावन की फिर वो झड़ी है
💥
*आजार -👉 जुलाब*
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
लय 💃 भारी  💃
       🙏👌☝☝☝☝👌🙏