Friday, 16 March 2018

सगळे घेतात माझ्या
सुख-दुःखाची दखल
एक तू सोडून...
खरचं इतका दूर
गेलास काय रे
सगळेच धागे तोडून...?
जग जवळ आलंय म्हणे
अन् अनोळखीही झालेत ओळखीचे
तुझा मात्र पत्ताच नाही
अन् तूच सांगायचा...
नातं आपलं शतजन्मीचे
वाढदिवसही वाटतो सूना
सुने झाले सण-समारंभ
तुझ्या शुभेच्छाविना
हरवलाय जगण्यतला आनंद
गेलोय आपण एकमेकांपासून
खूप दूर....
तरीही मन हेलावतं
जेव्हा येतो... तुझ्या आठवणींचा पूर
नसेल तुला चिंता माझी...
नसूदे... तक्रार नाही
मात्र तुझी खुशाली कळव
तुझं-माझं नातं एकदा तरी आठव

No comments:

Post a Comment