Tuesday, 20 March 2018


एखादी स्ञी राञी 12 नंतर Online राहत असेल तर ती एवढया राञी online का राहते?........... मोठ्ठा प्रश्न (?) ........
( मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का?...... हिच्या घरामधे काही problem असेल का?...... तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?...... कि हिचं नव-याशी जमतंच नसेल, कि आणखी काही problem असतील..... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असातात)
एखादी स्ञी जर प्रेम कविता लिहित असेल तर ....... Big question?(?) ....
( तिचं कोणावर प्रेम आहे का? ....... तिला कोणी आवडतो का? ....... किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?..... असेल तर लग्ना आधीचा आहे कि लग्नानंतरचा?...... आणि नसेल तर ही अशी लिहिते....वैगरे वैगरे .... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात
एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........ अतिशय मोठा प्रश्न (?)
( ही असे स्वतःचे फोट टाकत का असते?????,.... हिला काय दाखवायचं असतं?...... हिचं हे वय आहे का?..... ही अशी का वागते?...... वैगरे वैगरे असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात )
तर या सर्व प्रश्नाच एकच उत्तर ते म्हणजे, जरी ती एक स्त्री असली तरी ती एक माणूस आहे..... तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे...... तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते ......... आणि तिला ते जमतं देखील ...... तिच्या अश्या वागण्या मागे काही कारण असतचं असं नाही ........ कोणीही एखादी व्यक्ती असो त्याला अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो...... तुम्हांला जर जमत असेल तर तुम्ही पण या गोष्टी करा आणि जमत नसेल तर, उगीचच तिच्यावर "असंस्कारक्षम" असल्याच लेबल लावू नका...... एवढंच...

2 comments:

  1. ᐈ Casino Games Near Me - Oklahoma Casinos
    List of casinos with casino games 188bet close 가입머니 지급 사이트 to me. With over bet365es 1300 games in this list, you can 바카라 게임 bet online to win big with the help of the 브라 밝기조절 internet.

    ReplyDelete