जगण्याचा 'अनपेक्षित' मार्ग"
कधी कधी जीवनात आपण विचार करतो एक आणि होते एक " ह्या वाक्क्याचा सर्रास उपयोग आपण करीत असतो फक्त वाक्या समोर उगीचच "कधी कधी "असा शब्द लावतो, प्रत्यय मात्र रोजच येतो. का होत असेल असे याचा कधी आपण विचार करीत नाही किंवा तेवढा वेळ आपल्याजवळ नाही आहे. पण कधी थोडा थांबलात व शांतपणे विचाराधीन झालात तर मग मात्र हि उकल होईल. आपण प्रत्येक जण कोणातरी कडून काहीतरी अपेक्षा करीत असतो. आपली जशी इच्छा आहे तसे घडले पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा बाळगून आपण जगत असतो. आपल्या सभोवती असलेल्या जीव व अजीवाकडून सुद्धा. अगदी बेभान होऊन जसे काही आपण या जगाचे मालक आहोत. ज्याने त्याने आपल्या मनासारखे वागले पाहिजे, आईवडील, बहीण भाऊ, पत्नी मुले, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, ग्राहक , दुकानदार, सरकार, संस्था, इत्यादि इत्यादी. केवढा हा अट्टाहास, त्यांचे गृहीतके काय आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते आणि जेंव्हा या सर्वांकडून तुमच्या अपेक्षेची उपेक्षा होते तेंव्हा मात्र स्वतःच आत्मपरीक्षण न करता नुसता संताप व्यक्त होतो व तोंडातून वाक्य निघते , " अरे यार काय हे जीवन , मी काय विचार केला होता आणि हे काय झाले....!
जीवनात कोणाही कडूनच कोणतीच अपेक्षा ठेऊ नका. कुठलंच गृहीत करू नका, कुणावर कुठलंच बंधन टाकू नका, जेवढं सहज अन नैसर्गिक जगता येईल तेवढं जगा. बिनधास्त टाकून द्या निसर्गावर तुमच्या अपेक्षा. घडू द्या सर्व अनपेक्षित, जे जस होईल तस होऊ द्या. विश्वास ठेवा, पहा त्यातून निर्माण होईल तो आनंदच, समाधानच. उपेक्षा होणारच नाही तर मनस्तापही नाही. कोणतेच बंधन घालू नका मनावर कोणाच्या अपेक्षेचे, इच्छेचे, नात्याचे, जबाबदारीचे , निरंक, निर्मळ, निर्भेळ रहा. आशावादी रहा, सकारात्मक रहा हिच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे, जगण्याचा सोपा आणि " अनपेक्षीत " मार्ग सुद्धा...

No comments:
Post a Comment