*"ए आई" आणि " अहो आई " विषयीची एक छान कविता...*
माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रूजत नाही
तोवर तुलना होणारच दोघीमध्ये
ए आई आणि अहो आई।।
आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते
पण कर्तव्यदक्ष सुगृहीणी घडवण्यासाठी अहो आई कठोर वागते।।
जन्मदात्या आईची सर कोणालाही येणार नाही
पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही।।
ताणल्याशिवाय तुटत नाही
अन् टाळी एका हातानं वाजत नाही
असं एकतरी घर दाखवा बघू
जिथं भांड्याला भांड लागत नाही।।
अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान
म्हणजे घराच्या रंगमंचावर
होणारच नाही नाटक मानापमान।।
अहो आईचा मोठाच पाठींबा
घरादाराला त्याचाच आधार
मुलं तिच्याच स्वाधिन करून
आपण संभाळतो घरसंसार।।
माहेरची जाईजुई बहरून
सासरच्या मंडपावर चढते
ए आई इतकं मुलीचं कौतूक
अहो आई सुनेचंही करते।।
सर्व आया आणि सासवांनां समर्पित.....
No comments:
Post a Comment