Sunday, 11 March 2018

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली .प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही .
सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले ,'आपला आजचा तास इथेच संपतो आहे पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो .
किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले .
" काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती .वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं .पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली .रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक सुंदर ललना उभी होती . मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का ? हो , मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल . गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली .वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन .
तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे . मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली .एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं . निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली .अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल ....
'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो .'
प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला .
प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले ," माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे ."
***** , निघ बाहेर वर्गाच्या ...

No comments:

Post a Comment