Wednesday, 28 March 2018

गृहिणीची अचिव्हमेंट
मी घरीच असते.हे अगदी हलक्या आवाजात ती
म्हणाली…
माझं उत्तर, अरे व्वा मस्तच!!
काय मस्तच ग ?लाज वाटते मला,एवढं उच्च शिक्षण घेऊन, मी गृहिणी आहे सांगायची.
हल्ली सगळीकडे हा संवाद ऐकायला मिळतो.
स्वत:ला गृहिणी म्हणून जगायला लाज कशासाठी वाटायला हवी.आपली संस्कृती ,आपले संस्कार,आपले विचार,आचार व्यक्त करण्यासाठी तुम्हाला किती तरी वेळ मिळतो.आता वेळ नाही ही सबब प्रत्येक जण पुढे करते.तस काहीही नाही.स्वत:साठी
वेळ काढणे,त्याचा योग्य तो वापर करून स्वत:ला
व कुटूंबाला आनंदी ठेवणे , तुमच्याच हातात आहे.
तुमच्या कडे गृहिणीपद आहे,यात किती तरी गोष्टींचा आनंद घेऊ शकता.लग्न झाल्यानंतर हळूवारपणे बाळाची चाहूल लागते.त्या क्षणाचा आनंद घेत,त्याच्या गर्भातील हालचालींचा सुखद अनुभव.त्याच्या जन्मानंतर त्या बाळाची रोज होणारी प्रगती, पालथं पडणं,रांगणे, हळूहळू पाऊल टाकणे.आंघोळ
घालताना पाणी बघून त्याच्या डोळ्यात दिसणारा आनंद . हळूवार पावलांचा आवाज,त्याच्या तळव्यांचा स्पर्श.हे क्षण सहजासहजी नाही मिळत.हे उपभोगण्यासाठी तेवढा वेळ ही महत्त्वाचा आहे.
मुलं मोठी.व्हायला लागतात,मग त्यांचे खाणे पिणे, आवडीचे पदार्थ तयार करून खायला घालणे.खुप आवडता पदार्थ आईने केला की शाळेतून आल्यावर
प्रेमाने मारलेली मिठी.आवडती डिश खाताना शाळेत घडलेल्या गमतीजमती.कुणा मित्राची झालेली फजिती,ते सांगतानाच आलेलं खळखळत हसू.खरच सांगा सख्यानो हे सुख दहा तास नोकरी करताना मिळू शकते का ? शाळेच्या रोजच्या दैनंदिनीत इतक्या घटना घडतात की त्यांना घरी आल्याबरोबर ते ऐकायला एक हक्काचा श्रोता हवाच असतो.
या गोष्टी फक्त मुलांच्या बाबतीतच नाही तर,आपला जोडीदार,पती ,त्यालाही तेवढा वेळ देणे,त्याच्या सोबत वेळ घालवणे.संधी मिळेल तेव्हा विविध विषयावर चर्चा करणं हे देखील आनंददायी आहे.गृहिणी आहात म्हणून दुसरं काही करता येत नाही, असे नाही ना! तुम्ही आवडीच्या विषयावर वाचन करणे.चित्रपट बघणे, विणकाम ,भरतकाम, लिखाण करणे.एखाद्या आवडत्या छंदाचे अर्थार्जनात रूपांतर करणे.मुलांच्या वेळेप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी होणे.व्याख्यानम
ाला ऐकायला जाणं.चित्रप्रदर्शन बघणं.स्वत:ला सतत कार्यरत ठेवा.जगातील, देशातील, स्थानिक घडामोडींवर सतत अपडेट राहणं, जेणेकरून मुलांशी, पतीशी,व इतरांशी संवाद साधताना आपले व्यक्तिमत्त्व खुलले पाहिजे.
गृहिणी म्हणून जगाताना मी पैसे कमवू शकत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका.घरी राहिल्याने या सुखद क्षणांचा आस्वाद आपण घेऊ शकतो,हे लक्षात ठेवा.
पैसा कमावणे म्हणजेच जीवन सार्थकी लागते असे नाही ना.आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी करणे हाच नाही,तर तुम्ही उच्चशिक्षित असल्याने तुमच्या कुटुंबाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकता.हे कायम लक्षात ठेवा.हे आनंदाचे क्षण तुमच्या हृदयाच्या तिजोरीत जपून ठेवा,ती तुमच्या आयुष्यभराची साठवण आहे.तेव्हा अभिमानाने सांगा मी गृहिणी आहे......

No comments:

Post a Comment