Tuesday, 27 March 2018

भूक....
किती प्रकारची
कधी खपाटीला गेलेलं पोट
तर कधी ताटावर खिळलेली नजर
कधी अगदीच मंद झालेली हालचाल
तर कधी आधाश्यासारखं खाणं......
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत लोचट नजर
पैशांसाठी सदैव हपापलेले हात
अत्यंत निर्लज्ज असं वागणं बोलणं
तर कधी पैशासाठी कुठल्याही थराला जाणं........
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत जिज्ञासू ज्ञानपिपासू वृत्ती
डोळ्यांना लागलेला भिंगाचा चष्मा
पानांवरून झरझर फिरणारी नजर
बोलतानाही बोटं दोन पानात अडकलेली.......
दाखवते भूक . . . . .
.
.
.
.
.
.
कधी पायाला बसलेली घट्ट मिठी
तर्जनी पकडायला धावणारा हात
तर कधी कडेवर बसण्यासाठी पसरलेले हात
डोळ्यांमधे खचाखच भरलेलं आर्जव.......
दाखवते भूक . . . . .

No comments:

Post a Comment