Thursday, 22 March 2018

गावात रेंज असो वा नसो,
चेंज मात्र नक्की झालाय,
कनेक्टीव्हीटी वाढली पण,
माणुस माणसापासुन दुर गेलाय.....
गावागावात उभे झाले,
राजकारणाचे टाॅवर,
भाऊच भावाला दाखवतो ,
राजकारणाची पाॅवर.......
इथेही झळकतात शुभेच्छांचे,
मोठ्मोठाले बॅनर,
गावच्या समस्या शोधण्याचा,
नाही कुणाकडेच स्कॅनर.....
इथेही दिसतो प्रत्येक,
तरुणाच्या हाती स्मार्ट फोन,
तसाच का दिसु नये ?
उन्नतीचा स्मार्ट दृष्टीकोन.....
वायफाय सारखी कनेक्ट व्हावी,
माणसे इथली सगळी,
गाव एडीट करण्याची,
शक्कल लढवावी आगळी.......
एडीट करून व्हाट्सअप चे डिपी सजवतो ,
तसे एडीट करून सजवावे गाव,
फेसबुक व्हाट्सअप च्या वाॅलवरही मग,
तुमचाच वाढेल भाव......

No comments:

Post a Comment